Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला घरघर..! वर्षभरात ‘इतक्या’ रुपयांनी सोन्याचे दर घसरले; आजही पुन्हा सोने-चांदीचा भाव पडला

मुंबई : आज पुन्हा सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत. काल सोमवारी या दोन्ही धातूंचे दर वाढले होते. त्यामुळे या आठवड्यात तरी दरवाढ होईल, असा अंदाज होता. मात्र, आज दुसऱ्या दिवशी पुन्हा दर कपात झाली आहे. आज पहिल्या टप्प्यात सोने 0.15 टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे सोने दर सध्या 46 हजार 001 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहेत. तर दुसरीकडे चांदीचे दर सुद्धा 0.22 टक्क्यांनी घटले आहेत. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 60 हजार 503 रुपये असा झाला आहे.

Advertisement

मागील वर्षभराचा विचार केला तर 2020 मध्ये याच काळात सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये प्रति तोळा असे सर्वाधिक होते. त्यानंतर आज वर्षभरानंतर मात्र 46 हजारांपर्यंत कमी झाले आहेत. म्हणजेच, वर्षभरात सोने तब्बल 10 हजार 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. देशात आता सणासुदीचा काळ सुरू होणार आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर कमी होत असल्याचे दिसत असले तरी लवकरच दरवाढ होण्यास सुरुवात होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. डिसेंबरपर्यंत सोने 50 हजारांचा टप्पा पार करील असे सांगण्यात येत आहे. असे असले तरी सध्या मात्र भाव कमी होत आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

दरम्यान, आता सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे सोन्यास मागणी वाढण्याची शक्यता आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात मागणीत वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असे घडले तर सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply