Take a fresh look at your lifestyle.

अर्र हे काय..? येथे पेट्रोल-डिझेलचा सुकाळ; पण, पेट्रोल पंपांवर खडखडाट; पहा, नेमका कुठे घडलाय हा प्रकार

नवी दिल्ली : युरोपातील एका देशात सध्या नवेच संकट आले आहे. या संकटास तेथील ट्रक ड्रायव्हर कारणीभूत ठरले आहेत. ट्रक ड्रायव्हर मिळत नसल्याने पेट्रोल पंपांना वेळेत इंधनाचा पुरवठा करता आला नाही. त्यामुळे देशातील अनेक पेट्रोल पंपांवरील तेल संपले आहे. ब्रिटेनच्या पेट्रोल रिटेलर्स असोसिएशनने म्हटले आहे, की देशातील 5 हजार पेट्रोल पंपांपैकी दोन तृतीयांश पेट्रोल पंपांवर आता इंधन शिल्लक नाही. तर उर्वरीत पंपांकडेही अत्यंत कमी इंधन राहिले आहे.

Advertisement

जर ही समस्या आणखी वाढली तर अशी भिती वाटत असल्याने इंधनाची साठेबाजी केली जात आहे, त्यामुळे सुद्धा देशात इंधनाचे संकट निर्माण झाले आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष ब्रायन मैडरसन यांनी सांगितले.

Advertisement

देशात इंधनाची कोणतीच कमतरता नाही. मात्र, हे तेल सध्या टर्मिनल आणि रिफायनरीमध्ये अडकून पडले आहे. त्यामुळे तेल वाहतुकीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांकडे इंधन शिल्लक नाही. नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत आहे. पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तासनतास थांबल्यानंतर सुद्धा पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही, अशी येथील परिस्थिती आहे.

Advertisement

ब्रिटेनमधील उद्योग जगताचे म्हणणे आहे, की देशात सध्या ट्रक ड्रायव्हरची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. यामागे कोरोना महामारी आणि अन्य काही कारणे आहे. लोकांचे वाढते सरासरी वयोमान आणि ब्रेक्झिटमुळे अनेक लोकांनी देश सोडल्यामुळे सुद्धा असे संकट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिका, जर्मनीसह अन्य काही देश ट्रक ड्रायव्हरच्या समस्यांचा सामना करत आहेत. मात्र, ब्रिटेनला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथ पेट्रोल पंप रिकामे आहेत, आणि जीवनावश्यक वस्तू सुपर मार्केटमध्ये मिळत नाहीत.

Advertisement

या संकटावर मार्ग काढण्यासाठी आता ब्रिटेन सरकारने विदेशी ट्रक ड्रायव्हर्सना आपत्कालीन व्हिजा देण्याचा निर्णय घेतला आ़हे. त्यानुसार ऑक्टोबरपासून ट्रक ड्रायव्हर्सना 5 हजार व्हिजा जारी करण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply