Take a fresh look at your lifestyle.

‘डब्ल्यूएचओ’ चा चीनला झटका..! कोरोनाबाबत घेतलाय ‘हा’ धक्कादायक निर्णय; चीनचा होणार तिळपापड

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या उगमाच्या मुद्द्यावर चीनची जगभरात बदनामी झाली आहे. चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतून हा घातक विषाणू जगभरात पसरला, असा आरोप चीनवर सातत्याने होत आहे. हा आरोप खरा असल्याचे अनेक पुरावे मिळाल्याचा दावा जगातील अनेक तज्ज्ञांनी केला आहे. मात्र, चीनने सर्व आरोप फेटाळले होते. तसेच कोरोना विषाणू बाबत पुन्हा तपासणी करण्यास तयार नसल्याचेही म्हटले होते. मात्र, तरी सुद्धा अमेरिकेसह अन्य देशांनी चीनवर दबाव आणण्याचे राजकारण सुरुच ठेवले होते. त्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेनेही चीनला धक्का देणारा निर्णय घेतला आहे.

Advertisement

कोरोना विषाणूच्या उगमाची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य संघटनेने घेतला आहे. यासाठी 20 वैज्ञानिकांचे पथक नियुक्त केले आहे. हे पथक चीन आणि अन्य काही ठिकाणी भेटी देऊन तपासणी करणार आहे. या पथकात प्रयोगशाळा सुरक्षा, जैव सुरक्षेचे तज्ज्ञ, अनुवांशिक तज्ज्ञ आणि पशु रोग तज्ज्ञांचा समावेश आहे.

Advertisement

याबाबत वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे, की पथक चीन आणि अन्य ठिकाणी नवे काही पुरावे मिळतात का तपासणार आहे. याआधी मार्च महिन्यात चीन आणि आरोग्य संघटनेने केलेल्या संयुक्त तपासणीत कोरोना विषाणू प्रयोगशाळेतून फैलावला असेल, असे वाटत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर मात्र संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी हा रिपोर्ट परिपूर्ण नसल्याचे स्पष्ट करत पुन्हा तपासणी करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. या प्रस्तावात वुहान प्रयोगशाळा आणि काही मार्केटची तपासणी करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.

Advertisement

आता आरोग्य संघटनेने पुन्हा तपासणी करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, यावेळी चीनच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण, चीन यास तयार होईल, याची शक्यता सध्या दिसत नाही. आधीच्या पथकास बरखास्त केले आहे. त्यामुळे नव्या पथकास चीन मंजुरी देणार का, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट नाही. चिनी विदेश मंत्रालयाने याआधीच्या तपासणीवेळी पूर्ण सहकार्य केले आहे. त्यामुळे या नव्या तपासणीस चीन तयार होईल का, तपासणी पथकास देशात येण्यासाठी परवानगी देणार का, याबाबत अद्याप काही स्पष्ट नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply