Take a fresh look at your lifestyle.

आंध्र, ओडिसा किनारपट्टीवर ‘गुलाब चक्रीवादळा’चा रुद्रावतार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार, पाहा

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे काल (ता. 26) दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. पाकिस्तानने या चक्रीवादळाला ‘गुलाब चक्रीवादळ’ (Gulab Cyclone) असे नाव दिले आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या दिशेनं हे चक्रीवादळ सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टीवर चक्रीवादळाचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Advertisement

हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात गोपालपूर किनारपट्टीवर साचलेले ढग दिसत आहेत. तसेच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement

दरम्यान, गुलाब चक्रीवादळामुळे पुढील दोन दिवस दोन्ही राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही पाहायला मिळणार आहे. पुढील तीन दिवस राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज (दि.27) आणि मंगळवारी (दि.28) राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

हवामान खात्याने आज (सोमवारी) पुणे, नाशिक, सातारा, रायगड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट (Red alert) देण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) देण्यात आला असून, उद्या (मंगळवारी) पावसाचा जोर वाढणार आहे.

Advertisement

राज्यातील रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना मंगळवारी (दि.28) रेड अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, पुणे, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवार (दि.29) पासून राज्यातील पावसाचा जोर ओसरण्यास सुरवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

एलआयसीचा आयपीओ कधी येणार ? ; पहा, केंद्र सरकारने दिलीय ‘ही’ महत्वाची माहिती..
शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला सुरुवात.. आंदोलनाला कोणी कोणी दिलाय पाठिंबा, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply