Take a fresh look at your lifestyle.

तरीही खाद्यतेलांचे भाव वाढलेच; सणासुदीच्या काळात नागरिकांना झटका; सरकारी निर्णयही ठरले अपयशी

मुंबई : देशात खाद्य तेलांचे दर भरमसाठ वाढले आहेत. या एकाच वस्तूने सध्या लोकांच्या घरखर्चाचे बजेट पार कोलमडून टाकले आहे. आता तर सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे कितीही किंमती वाढल्या तरी तेलास मागणी वाढणार आहे. निदान या काळात तरी किमती कमी होतील, असे वाटत होते. मात्र, तसे काही घडलेले नाही. उलट या काळात सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या किंमती 5 ते 10 रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, तेलांच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारने तेलाचे आयात शुल्क कमी केले होते मात्र, त्याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नाही.

Advertisement

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा देशातील तेलबियाणांचे उत्पादन घटेल असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला होता. त्यामुळे भविष्यात खाद्यतेलाचे दर हे वाढणारच होते. पण याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसू नये, म्हणून खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले होते. कारण गेल्या काही दिवसांपासून तेलाचे दर हे वाढतच असल्याने किमान ऐन सणासुदीत जनतेला सरासरीच्या किमतीने खाद्य तेल उपलब्ध व्हावे हा त्यामागचा उद्देश होता. पण, आता सण उत्सव जवळ येऊन ठेपले असतानाच तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

Advertisement

सोयाबीन, शेंगादाणा, तीळ, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या दरात वाढ झाली आहे. या सर्व तेलांच्या किमती 5 ते 10 रुपयांनी वाढल्या आहेत. पुढील काही दिवसात तेलाचे दर आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची घट झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला 8 हजार 600 रुपये क्विंटलचा दर हा मिळालेला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांमध्ये सोयाबीनची आवक वाढताच दर हे निम्म्याने कमी झाले होते. सध्याही सोयाबीनचे दर कमी जास्त होत आहे. सोयाबीनचे दर कमी होऊनही सोयाबीन तेलाचे दर वाढत आहेत. सोयाबीन तेलात 5 रुपयांनी वाढ झालेली आहे. शेंगादाणा तेल जून महिन्यात 150 रुपयांनी विक्री होत होते. आता सप्टेंबर महिन्यात मात्र 155 रुपये दर आहेत. तसेच सूर्यफूल तेल 140 वरुन 150 पर्यंत पोहोचले आहे. सोयाबीन तेलाचे दर 130 रुपयांवरुन 140 रुपये झाले आहेत. तर पामतेलाचे दर 125 रुपयांवरुन 130 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply