Take a fresh look at your lifestyle.

IPL Update : कोलकाता संघाला बसला जोरदार झटका; ‘या’ महत्वाच्या खेळाडूने अचानक घेतली माघार; पहा, काय आहे नेमके कारण

दुबई : आयपीएलमध्ये कोलकाताचा संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. गुणतालिकेतही संघाने चौथा क्रमांक मिळवला आहे. असे असताना आता मात्र संघाच्या टेन्शनमध्ये वाढ करणारी घटना घडली आहे. संघातील महत्वाचा खेळाडू कुलदीप यादव भारतात परत आला आहे. कुलदीप यादवला दुखापत झाल्यामुळे त्यास स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी परत यावे लागले आहे. यानंतरच्या रणजी मालिकेतही त्याच्या सहभागाची शक्यता कमीच आहे. या दुखापतीतून बरे होण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा वेळ लागणार आहे.

Advertisement

आयपीएलच्या आगामी सामन्यांमध्ये तो सहभागी होण्याची कुठलीही शक्यता नसल्यामुळेच त्याला भारतात परत पाठवण्यात आल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  आयपीएलच्या पुढील सामन्यात यादव सहभागी होण्याची शक्यता दिसत नसल्याने त्यास माघारी पाठवले, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबल्यानंतर आयपीएल स्पर्धा जोमात सुरू झाली आहे. यावेळी स्पर्धा युएई मध्ये होत आहे. या दुसऱ्या सत्रात कोलकाता संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर संघ पोहोचला आहे. आता कोलकाताचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर होणार आहे. दिल्लीचा संघही सध्या आघाडीवर आहे.

Advertisement

या संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत गुणतालिकेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे कोलकातासाठी हा सामना आव्हानात्मक ठरणार आहे. अशात आता स्पीनर कुलदीप यादव संघात असणार नाही. त्यामुळे कोलकाताच्या अडचणी वाढणार आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply