Take a fresh look at your lifestyle.

बदलत्या राजकारणाचा तालिबानला फटका; संयुक्त राष्ट्रांनी घेतलाय ‘तो’ महत्वाचा निर्णय

वॉशिंग्टन : अफगाणिस्तान मधील तालिबानी सरकारला धक्का देणारा निर्णय अखेर संयुक्त राष्ट्रांनी घेतला आहे. संयुक्त राष्ट्रे अशाच प्रकारचा निर्णय घेतील असे अपेक्षित होते. या निर्णयामुळे तालिबानला सुरुवातीलाच जोरदार झटका बसला आहे. जागतिक राजकारणातील बदलत चाललेल्या घडामोडींचा अनुभव सध्या तालिबानी घेत आहेत. या निर्णयामुळे चीन आणि पाकिस्तानलाही एक प्रकारे झटका बसला आहे.

Advertisement

एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांना संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण देता येणार नाही.

Advertisement

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राच्या सर्वसाधारण सभेच्या शेवटच्या दिवसाच्या वक्त्यांच्या यादीत अफगाणिस्तान आणि म्यानमारच्या कोणत्याही वक्त्याचा समावेश केलेला नाही. याआधी मागील आठवड्यात तालिबानने संयुक्त राष्ट्र महासचिव एंतोनियो गुटेरेस यांना पत्र पाठवले होते. तालिबानच्या प्रवक्त्यास संयुक्त राष्ट्रात आपला दूत नियुक्त करणे तसेच महासभेत भाषण देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी ही मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे याठिकाणी तालिबानला कोणतेही प्रतिनिधीत्व मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जगातील देश सध्या तालिबानबाबत काय विचार करतात, हे सुद्धा स्पष्ट होत आहे.

Advertisement

अफगाणिस्तान मध्ये तालिबानने सरकार गठीत केले असले तरी कोणत्याही देशाने अद्याप या सरकारला मान्यता दिलेली नाही. चीन आणि पाकिस्तान तालिबानसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या देशांचे प्रयत्न सफल होताना दिसत नाहीत. सार्क देशांमध्ये तालिबानला सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता. मात्र, सार्क देशांनी यास कडाडून विरोध करत बैठकच रद्द करुन टाकली.

Advertisement

त्यानंतर इटलीनेही दुसरा झटका दिला. तालिबानने आपल्या सरकारमध्ये 17 दहशतवाद्यांना सहभागी करुन घेतले आहे. त्यामुळे या सरकारला मान्यता देता येणार नाही, असे स्पष्ट करत इटलीनेही तालिबान सरकारला मान्यता देणार नसल्याचे म्हटले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply