Take a fresh look at your lifestyle.

आता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..

नवी दिल्ली : कोरोना संकटातून देशाची अर्थव्यवस्था आता बऱ्यापैकी सावरली आहे. त्यामुळे शेअर बाजार आपल्या विक्रमी पातळीवर पोचला आहे. विविध कंपन्या मार्केटमध्ये आयपीओ (IPO) घेऊन येत आहेत किंवा काही कंपन्यांची यासंदर्भातील तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात गुंतवणूकदारांसाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Advertisement

गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये विविध कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले. त्याला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता त्यात आणखी एका कंपनीची भर पडणार आहे. मार्केटमध्ये आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार आहे. या कंपनीचे नाव आहे, गोदावरी बायोरिफानेरीज (Godavari Biorefineries)..

Advertisement
गोदावरी बायोरिफानेरीज कंपनी आपल्या आयपीओ अंतर्गत 370 कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहे. शिवाय प्रमोटर्स आणि डायरेक्टर 65,58,278 इक्विटी शेअर्सचे ओएफएस म्हणजेच ‘ऑफर फॉर सेल’ जारी करणार आहे.
गोदावरी बायोरिफानेरीज 100 कोटींच्या आयपीओ पूर्वनियोजनाचाही विचार करीत आहे. तसे झाल्यास नवीन इश्यूचा आकार घटू शकतो. कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि उसाच्या गाळप विस्ताराच्या भांडवली खर्चासाठी नवीन इश्यूतून मिळालेली रक्कम वापरणार आहे. शिवाय कंपनी ही रक्कम पोटॅश युनिटला भांडवली समर्थन देण्यासाठी वापरणार असल्याचे सांगण्यात आले.

देशात इथेनॉलवर आधारित रसायनांच्या निर्मितीत गोदावरी बायोरिफानेरीज कंपनी आघाडीवर आहे. इक्वायरस कॅपिटल आणि जेएम फायनान्शियलला त्यासाठी कंपनीने ‘बुक रनिंग लीड मॅनेजर’ म्हणून नियुक्त केले आहे.

Advertisement

आहात ना तयार..? खर्चाचे बजेट आणखी बिघडणार; म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर करतील रेकॉर्ड
आता या कंपनीने आयपीओ केलाय जाहीर; पहा, कधी येणार आयपीओ; कंपनीचे काय आहे नियोजन

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply