Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी..! ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य सरकारने घेतलाय निर्णय

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बराच कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील थिएटर्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृहे सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन चित्रपटगृह सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील सिनेमागृहे पुन्हा सुरू होणार आहेत.

Advertisement

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र, धोका अजूनही कायम आहे. सध्या रुग्णसंख्या कमी आहे. रुग्णालयात दाखल होण्याचेही प्रमाण बरेच कमी झाले आहे. या परिस्थितीचा अंदाज घेऊन लॉकडाऊनच्या निर्बंधांत सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शाळांबाबत निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे राज्यातील थिएटर्स बंद होती. कोरोना कमी झाल्यामुळे आता तरी सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. सरकारचाही त्याबाबत विचार सुरू होता. त्यानुसार दोन दिवसात सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

Advertisement

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आज थिएटर्स सुरू करण्याचाही निर्णय घेतला गेला आहे. जवळपास दीड वर्षांपासून थिएटर्स आणि नाट्यगृहे बंद आहेत. आता थिएटर्स पुन्हा सुरू करायचे म्हटल्यावर त्यासाठी काही वेळ लागणार आहे. या गोष्टीचा विचार करुन 22 ऑक्टोबरपासून थिएटर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Advertisement

याआधी दिल्ली, लखनऊमध्ये थिएटर्स सुरू केली आहेत. त्यामुळे राज्यातही असा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. चित्रपट क्षेत्रास सर्वाधिक उत्पन्न मुंबईतून मिळते. मात्र, येथेच सिनेमागृहे बंद होती. आता मात्र सरकारने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने हा निर्णय घेतला असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. या नियमांकडे आजिबात दुर्लक्ष करता येणार नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply