Take a fresh look at your lifestyle.

आहात ना तयार..? खर्चाचे बजेट आणखी बिघडणार; म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर करतील रेकॉर्ड

मुंबई : जागतिक पातळीवर सध्या कच्च्या तेलाच्या किमती कमी होताना दिसत नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे, मागणीच्या तुलनेत तेलाचा पुरवठा कमी होत आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने अनेक देशांनी निर्बंध मागे घेतले आहे. त्यामुळे या देशांतील आर्थिक घडामोडींनी वेग घेतला आहे. परिणामी पेट्रोलियम पदार्थांना मागणी वाढली आहे. वाढती मागणीच्या तुलनेत मात्र तेलाचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या परिस्थितीमुळे देशांनाही इंधनाच्या किमतीत वाढ करावी लागत आहे.

Advertisement

सध्या ब्रेंट क्रूड तेलाची किंमत 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात बाजारात इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

देशात तर आजच अनेक शहरात पेट्रोलचे भाव 110 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यातच जागतिक बाजारात तेलाचे दर वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात तेल कंपन्या काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तेलाच्या किमती कमी झाल्या तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात. मात्र, देशातील परिस्थिती पाहता असे होईल याची शक्यता फारच कमी आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर सरकारी तेल कंपन्या इंधनाचे दर कमी करतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांना पुन्हा झटका बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा दर 107.26 रुपये प्रतिलीटर इतका आहे. तर एक लीटर डिझेलसाठी 96.41 रुपये मोजावे लागतात. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 रुपये आणि 88.80 रुपये इतका आहे.

Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply