Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. हे काय..! युरोपातील ‘हा’ देश म्हणतोय चीनी कंपन्यांचे स्मार्टफोन फेकून द्या; पहा, नेमके घडलेय तरी काय ?

नवी दिल्ली : अवघ्या जगास कोरोनाच्या भयानक संकटात ढकलणाऱ्या चीनची जगभरात बदनामी झाली आहे. तरी देखील या देशाची अक्कल ठिकाणावर आलेली नाही. वेगवेगळ्या मार्गांनी देशांना त्रास देण्याच्या चीनच्या कुरापती सुरुच आहेत. लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवायचे, त्यांना धमकवायचे, विनाकारण त्रास द्यायचा, असे कारनामे चीनही आजही करत आहे. आता तर दुसऱ्या देशांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अशा कारवाया चीनने सुरू केल्या आहेत. चीनचा हा खतरनाक डाव काही देशांनी ओळखला असून ते देश सतर्क झाले आहेत.

Advertisement

युरोपातील लिथुआनिया या देशाने चीनचा हा डाव हाणून पाडण्याचा निर्णय घेतला आहे. या देशाच्या सरकारने देशातील नागरिकांना चीनी कंपन्यांचे फोन फेकून देण्याचे आवाहन केले आहे. चीनी कंपन्यांच्या मोबाइलच्या माध्यमातून देशाची सुरक्षाच धोक्यात येत असल्याचे लक्षात आल्याने हा निर्णय घेतला गेला. चिनी ब्रँड्सचे स्मार्टफोन वापरत असल्यास ते त्वरीत फेकून द्या, असे आवाहन लिथुआनियाच्या संरक्षण मंत्रालयाने नागरिकांना केले आहे. लिथुआनियाच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने चीनी कंपन्या स्मार्टफोनद्वारे हेरगिरी करत असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

चीन स्मार्टफोन ब्रँड्समध्ये सेन्सरशिप टूलचा वापर करत आहे. हे फोन्स काही शब्द सेन्सर करत आहे, असे लिथुआनियाच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने म्हटले आहे. या देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी नवीन चीनी कंपन्यांचे स्मार्टफोन विकत न घेण्याचा आणि सध्या वापरात असलेले चीनी कंपन्यांचे स्मार्टफोन शक्य तितक्या लवकर फेकून द्यावेत, असे म्हटले आहे. याबाबत ज्या कंपन्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्या कंपन्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणत्याही प्रकारचे सेन्सरशिप टूल नाही, असे म्हटले आहे. जर हे आरोप सिद्ध झाले तर चीनच्या मोबाइल कंपन्यांना मोठा झटका बसू शकतो. जगातही याचा विपरीत परिणाम होऊन अन्य देशही याबाबत आधिक कठोर धोरण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply