Take a fresh look at your lifestyle.

गुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात

दुबई : कोरोनाचा प्रादुर्भावामुळे थांबलेली आयपीएल पुन्हा सुरू झाली आहे. आयपीएलचे सामने युएईमध्ये सुरू आहेत. आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना होता. या सामन्यात दिल्लीच्या संघाने राजस्थानचा पराभव केला. या विजयानंतर दिल्लीने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हा संघ आता गुणतालिकेतही प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.

Advertisement

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने 155 रन्स केले. राजस्थानसाठी हे टार्गेट फारसे अवघड नव्हते. मात्र, गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर दिल्लीने अखेर विजय साकारला. आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या 10 ओव्हर संपल्या त्यावेळी निम्मा संघ माघारी परतला होता. मात्र, दुसऱ्या बाजूस कॅप्टन संजू सॅमसन याने चांगली कामगिरी केली. सॅमसनने 70 रन्स केले. मात्र, अन्य फलंदाजांनी त्यास फारसे सहकार्य केले नाही. फलंदाज लवकर बाद होत देले. त्यामुळे संघास मोठी भागीदारी करता आली नाही. त्यामुळे संघास 33 रन्सने पराभव पत्करावा लागला.

Advertisement

या विजयामुळे दिल्लीच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. इतकेच नाही तर संघाने प्ले ऑफमध्येही आपली दावेदारी जवळपास पक्की केली आहे. तसेच 16 गुणांसह गुणतालिकेत सुद्धा पहिला नंबर पटकावला आहे. गुणतालिकेत आतापर्यंत चेन्नईचा संघ आघाडीवर होता. आता मात्र या सामन्यात विजय मिळाल्याने दिल्ली कॅपिटल्स आघाडीवर आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply