Take a fresh look at your lifestyle.

सावधान..! बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना दिलाय अलर्ट

मुंबई : राज्यात मागील आठवड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अजूनही काही ठिकाणी पाऊस होत आहे. आता तर उद्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या 12 तासात आधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याचीही शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात आजपासूनच अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेही आज अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे.

Advertisement

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या 12 तासात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासात हे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Advertisement

रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जून महिन्यात मान्सूनने दमदार आगमन केले. त्यानंतर राज्यात या काळात अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आताही सप्टेंबर महिन्यात सुद्धा जोरदार पाऊस होत आहे. हवामानात काही प्रमाणात बदल होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply