Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे सरकारचा प्लान

गुवाहाटी : देशाच्या विकासात पूर्वोत्तर राज्यांचेही मोठे योगदान आहे. मात्र, या राज्यांकडे जितके लक्ष देणे गरजेचे होते तितके दिले गेले नाही, असा आरोप नेहमीच होत असतो. त्यामुळे आताच्या भाजप सरकारने पूर्वोत्तर राज्यांसाठी काही योजना सुरू केल्या आहेत. आताही केंद्र सरकारने या भागात तेल आणि नैसर्गिक वायू योजनांसाठी तब्बल एक लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत. या योजना राबविण्यात येणार असून 2025 पर्यंत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट सरकारने निश्चित केले आहे.

Advertisement

मागील सरकारचे पूर्वोत्तर राज्यांच्या बाबतीत जे धोरण होते त्यामध्ये बदल करण्यात आला. सध्या केंद्र सरकार आपल्या अॅक्ट ईस्ट या धोरणावर काम करत आहे. या अंतर्गत राज्यांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तसे पाहिले तर, पूर्वोत्तर राज्य रणनितीक रुपाने देशासाठी खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे या राज्यांकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. या क्षेत्राचा विकास होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे केंद्र सरकारने येथे अनेक योजना आणि प्रकल्प सुरू केले आहेत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले.

Advertisement

केंद्र सरकारने आताही या राज्यांमध्ये पेट्रोलियम पदार्थांशी संबंधित काही योजना सुरू केल्या आहेत. या प्रकल्पांसाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केली आहे. पुढील चार वर्षात या योजना पूर्ण होतील असे अपेक्षित आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply