Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. पुढच्या महिन्यात तब्बल 20 दिवस बँका राहणार बंद; पहा, कोणत्या राज्यात कधी राहणार बँका बंद

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात देभरात सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्यामुळे सहाजिकच या महिन्यात बँकांनाही जास्त सुट्ट्या असतात. आताही ऑक्टोबर महिन्यात देशातील बँका तब्बल 20 दिवस बंद राहणार आहे. म्हणजे, या महिन्यात फक्त 11 दिवस बँकांचे कामकाज सुरू राहिल. असे असले तरी देशात बँकांना वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या आहेत. त्यामुळे एकाच दिवशी सर्वच बँका बंद असे होणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्या दिवशी बँक बंद राहणार आहे, याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही बँकांच्या सुट्ट्यांचा विचार करून बँक कामकाजाचे नियोजन करावे.

Advertisement

रिजर्व बँकेने काही राज्यांसाठी प्रादेशिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे काही दिवस काही राज्यांतील बँका बंद राहतील. निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट्स कायद्यांतर्गत आरबीआयने ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्या निश्चित केल्या आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. ऑक्टोबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत माहिती दिली आहे. त्यामध्ये कोणत्या राज्यांतील बँका बंद राहणार आहेत. याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

2 ऑक्टोबर देशातील सर्व राज्यातील बँका बंद राहणार आहेत. 3 ऑक्टोबर रोजी रविवार आहे. त्यामुळे या दिवशी बँका बंद असतातच. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी अगरतळा, बंगळुरू आणि कोलकाता विभागातील बँकांना सुट्टी आहे. 7 ऑक्टोबरला इम्फाळ येथे बँका बंद आहेत. 9 ऑक्टोबरला दुसरा शनिवार आणि 10 ऑक्टोबरला रविवार यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहतील.

Advertisement

12 ऑक्टोबरला अगरतळा, कोलकाता येथील बँका बंद असतील. 13 ऑक्टोबरला अगरतळा, रांची, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पटना येथील बँका बंद असतील. 14 ऑक्टोबर रोजी अगरतळा, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, पटना, रांची, शिलाँग आणि तिरुअनंतपूरम विभागातील बँकांना सुट्टी आहे.

Advertisement

15 ऑक्टोबर रोजी इंफाळ आणि शिमला वगळता देशातील सर्व ठिकाणी बँका बंद असतील. 16 ऑक्टोबर गंगटोक, 17 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी), 18 ऑक्टोबर गुवाहाटी येथे बँका बंद, 19 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपूरम विभागातील बँका बंद.

Advertisement

20 ऑक्टोबर अगरतळा, बंगळुरू, चंदीगड, कोलकाता आणि शिमला येथे बँका बंद. 22 ऑक्टोबर जम्मू आणि श्रीनगर, 23 ऑक्टोबर चौथा शनिवार आणि 24 ऑक्टोबर रविवार (साप्ताहिक सुटी), 26 ऑक्टोबर जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. तसेच 31 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply