Take a fresh look at your lifestyle.

आता या कंपनीने आयपीओ केलाय जाहीर; पहा, कधी येणार आयपीओ; कंपनीचे काय आहे नियोजन

मुंबई : कोरोनाच्या संकटात सगळीच वाताहत झाली आहे. असे असतानाही शेअर बाजार मात्र दमदार कामगिरी करत आहे. कोरोनाचा शेअर बाजारास फारसा फटका बसल्याचे दिसत नाही. काल तर शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली. शेअर बाजार निर्देशांकाने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे. आताही आयपीओच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात दाखल होत आहेत. तर काही कंपन्यांनी आयपीओ आणण्याचे नियोजन केले आहे. आताही वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपनीने आयपीओ जाहीर केला आहे.

Advertisement

आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लिमिटेड समभाग विक्रीतून भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 29 सप्टेंबर आपली ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग’ (आयपीओ) सुरू करणार आहे. या ऑफरचा प्राइज बँड प्रती समभाग 695 ते 712 रुपये असा ठरवला आहे. समभागांच्या विक्रीतून कंपनी साधारण 2768.25 कोटींचा निधी उभारणार आहे. या ऑफरमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या 2,850,880 आणि सनलाइफ (इंडिया) एएमसी इन्व्हेस्टमेंट आयएनसीच्या 36,029,120 समभागांचा समावेश आहे.

Advertisement

या माध्यमातून कंपनी भांडवल उभारणी करणार आहे. सध्या देशात अनेक कंपन्या आपला आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. हॉटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओयो हॉटेल्स तर तब्बल 1 अब्ज डॉलर्सचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढच्या आठवड्यात सेबीला कागदपत्रे सुपूर्द करण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त पतंजली, एलआयसी, पेटीएम, नायरा या काही मोठ्या कंपन्या लवकरच आपला आयपीओ आणण्याची तयारी करत आहे.

Advertisement

त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आधिक संधी उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या संकटातही शेअर बाजाराच्या माध्यमातून देशभरात मोठी उलाढाल होत आहे. या संकटाचा फारसा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे सध्या तरी दिसत नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply