Take a fresh look at your lifestyle.

राज्यात पावसाचा मुक्काम वाढला..! पुढील 5 दिवस ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; पहा, काय आहे नवा अंदाज

मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. आताही आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पाऊस पडणार आहे. आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Advertisement

आजपासून पुढील चार दिवस विदर्भात हळुहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये सोमवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात रविवारी आणि सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई येथेही सोमवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तोपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Advertisement

सध्या मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 12 टक्के जास्त पाऊस पडला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस पडला आहे. औरंगाबादसह परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यातील अनेक धरणे भरून वाहत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. नगर, धुळे आणि सातारा, औरंगाबाद, बीड, परभणी येथे अतिरिक्त तर जालना येथे तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई येथे सुद्धा अतिरिक्त पाऊस पडला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply