Take a fresh look at your lifestyle.

ॲम्ब्युलन्सवरील सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा..

पुणे : वाहनांना भारतीय वाद्यांचे हॉर्न बसवण्याची भन्नाट आयडिया मांडल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रुग्णवाहिकेच्या सायरनचाही आवाज बदलणार असल्याचे सांगितले.

Advertisement

पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, “मी सर्व मंत्र्यांचे हॉर्न बदलले, लाल दिवे काढून टाकले. आता पोलिस आणि अ‍ॅम्ब्युलन्सचे दिवे आहेत. मी नागपुरात 18व्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहतो. रोज एक तास प्राणायम करतो, तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात की साऊंडमुळे किती त्रास होतो. मेडिकल सायन्सप्रमाणे याचा एक दुष्परिणाम होतो आपल्यावर..”

Advertisement

ते म्हणाले, “दवाखान्याची बिलं आपण भरतो, त्याचे कारण वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आहे. मी आता एक ऑर्डर काढणार आहे, की जर्मन संगीतकार होता. त्याने आकाशवाणीची एक ट्यून तयार केली होती. सकाळी साडेपाच वाजता ती ट्यून वाजायची. मी ती ट्यून शोधून काढली आहे आणि मी म्हटलं अ‍ॅम्ब्युलन्सवर ही ट्यून लावा. ती कानाला चांगली वाटते.”

Advertisement

पुण्यात मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. पुण्यातील एअरपोर्टसाठी संरक्षण विभागाकडून जागा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी संरक्षण विभागाकडून चंदीगड आणि पुण्याच्या जागेची अदलाबदल करण्यात येईल. त्याला मंजुरी मिळालीय. पुण्यातील नदी प्रकल्पालाही मंजुरी मिळाल्याचे गडकरी म्हणाले.

Advertisement

पुण्यातही नागपुरप्रमाणे वाघोली ते शिरुर हा रस्ता 50 हजार कोटी खर्च करून बांधण्याचा विचार आहे. हा रस्ता तीनमजली असेल. दोन मजले उड्डाणपूलाचे, तर शेवटचा तिसरा मजला मेट्रोसाठी असेल. त्यासाठी मदत करण्यास केंद्र तयार आहे, राज्याने त्यासाठी जीएसटी माफ करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.

Advertisement

ते म्हणाले की, मुंबईतील नरिमन पॉईंटला दिल्लीला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य सरकारसोबत लवकरच बैठक घेणार आहे.  पुणे ते कोल्हापूर,  पुणे ते सोलापूर,  पुणे ते बारामती अशा ज्या ज्या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे आहे, तिथे मेट्रो चालवता येईल. त्याचे तिकिट रेल्वेसारखेच राहील. मेट्रोला दोन मिल गाडीचे डबे असतील.  त्यातून दूध, फळांची वाहतूक होईल. ही मेट्रो खाजगी व्यवसायिकांना चालविण्यास द्यावी.

Advertisement

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गडकरी यांनी गाड्यांना भारतीय वाद्यांच्या आवाजातील हॉर्न बसविणार असल्याचे सांगितलं होते. याबाबत लवकरच कायदा करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली होती.

Advertisement

राज्यात पावसाचा मुक्काम वाढला..! पुढील 5 दिवस या जिल्ह्यांत जोरदार बरसणार; पहा, काय आहे नवा अंदाज
चक्क काँग्रेसने घातले भाजपासमोर लोटांगण; राज्यात राजकीय खळबळ; वाचा नेमकं काय घडलंय

Advertisement
Advertisement

Leave a Reply