Take a fresh look at your lifestyle.

कार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार ‘तो’ आदेश; पहा, नेमके काय म्हणालेत केंद्रीय मंत्री गडकरी

नवी दिल्ली : देशतील वाहन उद्योगावर परिणाम करणारा महत्वाचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने तशी तयारी सुद्धा केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे. देशातील सर्व वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना फ्लेक्स फ्यूएल इंजिन उत्पादन बंधनकाकर केले जाणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यात याबाबत आदेश देण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. देशातील वाहन कंपन्यांनी फ्लेक्स इंजिन तयार करावे, असे आवाहन मागील दोन वर्षांपासून करण्यात येत होते. आता मात्र यासाठी ठोस निर्णय घेण्याचे सरकारने ठरवले आहे. अशा प्रकारच्या इंजिनसाठी प्रथमच असा आदेश जारी करण्यात येणार आहे.

Advertisement

फ्लेक्स फ्यूएल इंजिनमध्ये पेट्रोल आणि इथेनॉल किंवा मिथेनॉलचा वापर करता येऊ शकतो. सद्यस्थितीत भारतात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. मात्र, इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत. आता मात्र इथेनॉलचे प्रमाणात वाढ केली गेली तर इंजिनमध्ये सुद्धा काही आवश्यक बदल करावे लागणार आहेत. म्हणूनच कार कंपन्यांनी वाहनांच्या इंजिनमध्ये बदल करावेत, असे सांगण्यात येत होते.

Advertisement

देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारने पर्यायी इंधनाचा विचार सुरू केला आहे. पर्यायी इंधनामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. तसेच देशाच्या कच्च्या तेलाच्या मागणीतही घट होईल, असे गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. सध्या भारत 80 टक्क्यांपेक्षा जास्त कच्चे तेल आयात करतो.

Advertisement

तेलाच्या खरेदीसाठी सरकारला अब्जावधी रुपये खर्च करावे लागत आहेत. डॉलरमध्ये व्यवहार होत असल्याने परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागते. सरकार कच्च्या तेलाची आयात कमी करुन खर्चात कपात करील. तसेच देशात इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply