Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार ऐकत नाही; राकेश टिकैत यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत आठ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. तरी देखील केंद्र सरकारने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार केव्हाही तयार आहे. मात्र, कृषी कायदे कोणत्याही परिस्थितीत रद्द केले जाणार नाहीत, असे सरकारने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे आंदोलकांनीही कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे अजूनही तोडगा निघालेला नाही. आता या मुद्द्यावर शेतकरी नेते यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे लक्ष वेधले आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे बायडेन यांनी आता या मुद्द्यावर त्यांच्या बरोबर चर्चा करावी, असे टिकेत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement

‘अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, आम्ही भारतीय शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहोत. आंदोलना दरम्यान मागील 11 महिन्यात 700 शेतकऱ्यांनी प्राण गमावले आहेत. आम्हा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे कायदे मागे घेतले गेले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत आपण या प्रश्नाकडे लक्ष द्याल,’ असे ट्विट टिकेत यांनी केले आहे.

Advertisement

केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करत विविध शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारने हे कायदे तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मात्र, केंद्र सरकार सुद्धा कोणत्याही परिस्थितीत कायदे मागे घेण्याच्या विचारात नाही. या व्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. याआधी सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली आहे, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

तर दुसरीकडे केंद्र सरकार सुद्धा कायदे मागे घेण्यास तयार नाही, त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन सुरूच आहे. केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यावर टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली. टिकैत पुढे म्हणाले, की आताचे सरकार कायदे मागे घेईल असे वाटत नाही, त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन 2024 पर्यंत चालेल. निवडणुकांमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान उभे करू, असे इशाराही त्यांनी याआधी दिला होता.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply