Take a fresh look at your lifestyle.

राजकारण फिरले..! अमेरिकेने भारताला दिलाय जोरदार झटका; चीनविरोधी ‘त्या’ आघाडीत एन्ट्री नाही

वॉशिंग्टन : राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. ज्या ठिकाणी आपला फायदा असेल त्यानुसार निर्णय घेतले जात असतात. याचा अनुभव सध्या भारत घेत आहे. कारण, अमेरिका भारताला नेहमीच मित्र असल्याचे सांगत असताना आता त्याच अमेरिकेने भारताला अपेक्षित नसलेला निर्णय घेतला आहे. भारतासाठी हा एक धक्का असल्याचे मानले जात आहे. होय, ज्या चीनचा त्रास भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना आहे. त्या चीनला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या त्रिपक्षीय आघाडीत भारताचा समावेश करण्यास अमेरिकेने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटेन या देशांना बरोबर घेत हिंद-पॅसिफिकच्या सुरक्षेसाठी एका त्रिपक्षीय आघाडीची घोषणा केली होती. या आघाडीस हिंद-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा सामना करण्याचा प्रयत्न म्हणून पाहण्यात येत आहे. त्यामुळे भारतही या आघाडीत असेल अशी शक्यता होती. मात्र, तसे काही घडलेले नाही. अमेरिकेने सध्या भारताचा विचार केलेला नाही. आशियामध्ये भारत हा चीनचा प्रमुख विरोधक आहे.

Advertisement

भारताचे सामर्थ्य सध्या काय आहे हे जगाला माहित आहे. सध्या चीन आणि भारत यांच्यातील तणावाच्या काळात भारताने जे धोरण स्वीकारले, त्याचाही अनुभव जगाने घेतला आहे. भारत सध्या चीनला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. असे असतानाही अमेरिकेने चीन विरोधातील आघाडीत भारताचा विचार केलेला नाही. असा निर्णय घेण्यामागे काय कारण आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement

मात्र, जो बायडेन राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर अमेरिकेचे चीनबाबतचे धोरण बदलले आहे. आता तितकासा आक्रमकपणा जाणवत नाही. त्याचा अंदाज चीनला सुद्धा आला आहे. अमेरिका सध्या वाद टाळण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. अफगाणिस्तान मधून बाहेर पडल्यानंतरही अमेरिकी नेत्यांनी वक्तव्ये तपासली तरी या बदललेल्या धोरणाचा अंदाज येतो.

Advertisement

या आघाडीत फ्रान्स, जपान या देशांनाही घेतलेले नाही. फ्रान्सने मात्र अमेरिकेच्या या निर्णयावर जोरदार टीका केली होती. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अमेरिकेने अद्याप तरी आपला निर्णय बदललेला नाही. भविष्यात यामध्ये काही बदल होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply