Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदीचे मार्केट डाऊन; दर कमी होण्याचा ट्रेंड आजही कायम; पहा, आज काय आहेत नवीन भाव

मुंबई : सोन्याच्या दरात आजही घसरण झाल्याचे दिसून आले. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोने 140 रुपयांनी कमी झाले. तसेच चांदीच्या दरात देखील 200 रुपये कपात झाली आहे. या दर कपातीमुळे सोने आता 46 हजारांच्या आत आले आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 46 हजार 52 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. यामध्ये 8 रुपये कमी झाले आहेत. एक किलो चांदीचा भाव 60 हजार 614 रुपये असा असून यामध्ये 175 रुपये कमी झाले आहेत.

Advertisement

या आठवड्यात तर अनेक वेळेस सोने आणि चांदीचे भाव कमी झाले आहेत. जागतिक बाजारात ज्या घडामोडी घडत आहेत त्यानुसार देशांतर्गत मार्केटमध्ये सोने आणि चांदीचे भाव कमी जास्त होत आहेत. काल गुरुवारी सुद्धा या दोन्ही धातूंचे भाव कमी झाले होते. सोने 332 रुपये तर चांदीचे भाव 680 रुपयांनी कमी झाल होते.

Advertisement

आज शेअर बाजारात तेजी आहे. फेडरल रिजर्वने व्याजदरात वाढ होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कमॉडिटीवर दबाव निर्माण झाला आहे, असे कोटक सिक्युरिटीजचे कमॉडिटी विश्लेषक रवींद्र राव यांनी सांगितले. जागतिक बाजारात सध्या सोन्याचे दर 1.6 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्याचाही परिणाम देशातील सोने मार्केटवर पडला आहे. यामुळे आज पुन्हा सोने आणि चांदीचे दर कमी झाले आहेत.

Advertisement

गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी राजधानी दिल्ली शहरात 22 कॅरेटसाठी 45 हजार 350 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 480 रुपये असा आहे. कोलकाता मध्ये 22 कॅरेटसाठी 45 हजार 900 रुपये, आणि 24 कॅरेटसाठी 48 हजार 600, मुंबई शहरात 22 कॅरेटसाठी 45 हजार 240 रुपये तर 24 कॅरेटसाठी 46 हजार 240 रुपये, चेन्नईमध्ये 22 कॅरेटसाठी 43 हजार 570 रुपये तर 24 कॅरेटसाठी 47 हजार 530 रुपये असे नवीन दर आहेत.

Advertisement

दरम्यान, देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply