Take a fresh look at your lifestyle.

.. ‘त्या’ मुळे देशात खाद्यतेलांच्या किंमती होतील कमी; पहा, तज्ज्ञांनी काय सांगितली कारणे

मुंबई : देशात महागाई काही कमी होण्यास तयार नाही. महागाई कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर फारसे प्रयत्न होत नाहीत. खाद्यतेलांच्या दरवाढीने तर सर्वसामान्य नागरिक अगदीच हैराण झाले आहेत. खाद्यतेलांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे घरखर्चाचे बजेट कोलमडले आहे. तेलांचे दर इतके कधीच वाढले नव्हते.

Advertisement

त्यामुळे या प्रकारच्या महागाईचा अनुभव जनता प्रथमच घेत आहे. तेलांचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तेलांवरील आयात शुल्क कमी केले होते. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आताही तेलाच्या किमती नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहेत.

Advertisement

देशात अशी परिस्थिती असताना खाद्यतेलांच्या पुरवठ्यातील विस्कळीतपणा मात्र कमी झाला आहे. त्यामुळे पुढील सहा ते 12 महिन्यांच्या काळात खाद्यतेलांचे भाव कमी होऊ शकतात, असे इंडस्ट्रीच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे. एलएमसी इंटनेशनलच्या कमॉडिटी कन्सल्टेंसीचे अध्यक्ष जेम्स फ्राई यांनी आगामी काळात तेलाच्या किमती कमी होतील, असे अपेक्षित आहे, असे सांगितले.

Advertisement

इंडोनेशिया, मलेशिया या देशांत तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जगभरातील अनेक देशांना तेल पुरवठा केला जातो. भारतही या देशांकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. पुढील काही महिन्यात इंडोनेशिया मध्ये तेलाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता आहे.

Advertisement

मात्र, यामुळे सोया तेलाचा पुरवठा वाढेल याची मात्र खात्री नाही. सूर्यफूल तेलाचे उत्पादन वाढणार आहे. त्याचा परिणाम म्हणून पाम तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सोयाबीन तेलाच्या तुलनेत सूर्यफूल तेलास बाजारात चांगली मागणी राहिल, असे सांगण्यात येत आहे. जगातील तेल खरेदीदार देशांनाही याचा फायदा होणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply