Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानचं झालंय पुन्हा हसू.. पाक पोलिसांचा अनोखा कारनामा, पाहा काय उद्योग केलाय..?

श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक टीम पाकिस्तान दौऱ्यावर जायला तयार होत नाहीत. मात्र, त्यानंतरही न्यूझिलंडची टीम पाकिस्तान दौऱ्यावर आली होती. तेथे 8 दिवस थांबल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्या वन-डे टाॅसला काही मिनिटे शिल्लक राहिलेली असताना, न्युझीलंड संघाने पाकिस्तान दौऱ्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे जगभर पाकिस्तानची नाचक्की झाली. न्यूझीलंडने धोका दिल्याचा आरोप पाकिस्तानने केला.

Advertisement

आधीच पाकिस्तान क्रिकेट बाेर्ड आर्थिक अडचणीत आहे, त्यात न्युझीलंड पाठोपाठ इंग्लंडनेही आपला दौरा रद्द केला. त्यात आता पाकिस्तानचा आणखी नवा कारनामा समोर आला असून, त्यामुळे सर्वत्र पाकिस्तानचं हसू झालं आहे.

Advertisement

न्यूझीलंड खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पाकिस्तानच्या पोलिसांनी या 8 दिवसांत तब्बल 27 लाख रुपयांची बिर्याणी खाल्ली. पाकिस्तानातीलच एका वेबसाईटने ही माहिती दिली आहे.

Advertisement

न्यूझीलंड दौरा रद्द झाला असला, तरी या दौऱ्यासाठी 27 लाख रुपयांचं बिर्याणीचे बिल आले आहे. न्यूझीलंड टीमला सुरक्षा देणाऱ्या पोलिसांनी ही बिर्याणी खाल्ल्याचं वृत्त पाकिस्तानी वेबसाईटने दिलं आहे.

Advertisement

न्यूझीलंड टीमला 8 दिवस सुरक्षा देण्यासाठी पोलिसांची संपूर्ण टीम तैनात करण्यात आली होती. न्यूझीलंडची टीम इस्लामाबादच्या सेरेना हॉटेलमध्ये थांबलेली असताना, त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या इस्लामाबाद पोलिसांनी 27 लाख रुपयांची बिर्याणी खाल्ली. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी 5 एसपी आणि अनेक एसएसपी होते. या सगळ्यांनी मिळून बिर्याणीवर ताव मारला.

Advertisement

न्यूझीलंड टीममधील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी इस्लामाबाद कॅपिटल टेरेटरी पोलिसांचे 500 जणांचे पथक तैनात होते. पोलीस दिवसातून 2 वेळा भरपेट जेवत होते, ज्यात बिर्याणी सर्वाधिक वेळा मागविण्यात आली. पोलिसांच्या आठ दिवसांच्या जेवणाचा खर्च 27 लाख रुपये झाला. अर्थ विभागाकडे बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी आली, तेव्हा याचा खुलासा झाला.

Advertisement

ठेवीदारांना दिलासा..! बुडित 21 बॅंकांकडून परत मिळणार ठेवीचे पैसे, महाराष्ट्रातील या 11 बॅंकांचा समावेश..!
सोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि चांदीचे बाजारभाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply