Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा निर्णय..

नवी दिल्ली : गेल्या वर्षी लडाखच्या गलवान खोऱ्यातील सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. तेव्हापासून भारत सरकारने चीनविरोधात कडक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर एलआयसीचा (LIC) आयपीओ (IPO) येत असून, त्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी सरकार 20 टक्के राखीव ठेवणार असल्याचे समजते. मात्र, त्यातही मोदी सरकार चीनला झटका देण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. भारताच्या विमा बाजारामध्ये या कपंनीचा वाटा 60 टक्के असून, 500 ​​अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे. देशातील या सर्वात मोठी विमा कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) लवकरच येणार आहे. एलआयसीचा आयपीओ 12.2 अब्ज डाॅलरपर्यंत असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाहीत एलआयसीचा IPO येणे अपेक्षित आहे. सरकारने आयपीओ व्यवस्थापित करण्यासाठी एकूण 10 बीआरएलएम कंपन्यांची नियुक्ती केली आहे. त्यात गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंक, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लि., कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेएम फायनान्शियल लि., सिटीग्रुप इंक आणि नोमुरा होल्डिंग्ज इंक आदींचा समावेश आहे.

Advertisement

एलआयसीच्या IPO च्या मदतीने सरकारने 90 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, एलआयसीच्या आयपीओची घोषणा केली होती. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने निर्गुंतवणूक आणि खासगीकरणाचे 1.75 लाख कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे सरकारला एलआयसीच्या आयपीओमधून मोठ्या निधीची अपेक्षा आहे.

Advertisement

चिनी गुंतवणूकदारांना ‘नो एन्ट्री’..
देशातील या सर्वात मोठ्या आयपीओमध्ये परदेशी गुंतवणूकदारांना भाग घेता येणार असल्याची सरकारची योजना आहे. मात्र, त्यात चिनी गुंतवणूकदारांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे समजते.

Advertisement

दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे एलआयसी आयपीओमध्ये चीनची गुंतवणूक सरकारला थांबवायची आहे. चीनने एलआयसीमध्ये गुंतवणूक केल्यास धोका निर्माण होऊ शकतो, असा सरकारला विश्वास आहे. त्यामुळेच हा धोका लक्षात घेऊन, केंद्र सरकार चिनी कंपन्यांवर बंदी घालण्याचा विचार करीत असल्याचे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Advertisement

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये पुन्हा मंदी.. बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण, तज्ज्ञ काय म्हणतात, वाचा..
पाकिस्तानचं झालंय पुन्हा हसू.. पाक पोलिसांचा अनोखा कारनामा, पाहा काय उद्योग केलाय..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply