Take a fresh look at your lifestyle.

ऑक्सिजनचे ‘राजकारण’ अजूनही सुरूच; ‘आप’ ने केंद्र सरकारवर केलाय ‘हा’ गंभीर आरोप

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाली होती. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. तर दुसरीकडे मात्र देशभरात या मुद्द्यावर सुरू असलेले राजकारण अजूनही थांबण्यास तयार नाही. आता पुन्हा दिल्ली सरकारच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर आरोप केल्याने ऑक्सिजनचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. ऑक्सिजन कमतरतेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने राजकारण केले. ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारने गठीत केलेल्या समितीस रोखण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असे आरोप दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केले आहेत.

Advertisement

दिल्ली सरकारने जून महिन्यात चार सदस्यीय समिती नियुक्त केली होती. यामध्ये मेडिकल तज्ज्ञांचा समावेश होता. फाईल मंजुरीसाठी उपराज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने उपराज्यपाल कार्यालयाच्या माध्यमातून यास रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जैन यांनी केला. त्यानंतर आता न्यायालयाने मात्र समिती नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ऑक्सिजनअभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असेल तर अशा प्रकरणांची चौकशी समिती करणार आहे. रुग्णालय किंवा घर कुठेही मृत्यू झाला असेल तरीही चौकशी होईल. समिती तपासणी करेल आणि यामध्ये तथ्य आढळले आणि तसे सिद्ध झाले तर नुकसान भरपाई देण्याची शिफारस करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, ऑक्सिजनच्या मुद्द्यावर मध्यंतरी देशभरात मोठे वादळ उठले होते. ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नसल्याचा अहवाल केंद्राने दिल्यानंतर तर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. विरोधी पक्षांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली. दबाव वाढत असल्याचे पाहून केंद्राने शहाणपणा दाखवत ऑक्सिजनअभावी किती मृत्यू झाले आहेत, याची माहिती राज्यांकडून मागवली होती.

Advertisement

त्यानंतर बहुतांश राज्यांनी ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, असे अहवाल दिले होते. त्यानंतर ऑक्सिजनचा हा मुद्दा मागे पडला होता. आता मात्र, दिल्ली सरकारच्या आरोग्य मंत्र्यांनी पुन्हा या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरले आहे. त्यामुळे यावर आता केंद्र सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply