Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ साठी 50 लाख चीनी कामगार पाकिस्तान गाठणार; पहा, काय आहे ड्रॅगनचा खतरनाक प्लान

नवी दिल्ली : पाकिस्तान मध्ये चीनचा हस्तक्षेप सातत्याने वाढत चालला आहे. सीपईसी प्रकल्पाच्या नावाखाली चीनने पाकिस्तानला अब्जावधींचे कर्ज दिले आहे. त्यामुळे चीनच्या कोणत्याही कार्यवाहीस पाकिस्तानी राज्यकर्त्यांना विरोध करत नाहीत. त्यामुळे चीनने आता मनमानी सुरू केली आहे. आता चीनने पाकिस्तानबाबत आणखी एक खतरनाक प्लान तयार केला आहे. पाकिस्तान मधील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे कारण देत चीन पुढील चार वर्षात आपल्या 50 लाख नागरिकांना पाकिस्तान मध्ये पाठवणार असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

पाकिस्तान मधील आरोग्य व्यवस्था मजबूत करणे तसेच येथील वैद्यकिय तज्ज्ञांना आधुनिक मेडिकल तंत्रज्ञान आणि पारंपारिक चिनी चिकित्सा पद्धती काय आहेत, याची माहिती दिली जाणार आहे. असा उद्देश असल्याचे सांगण्यात येत असले तरी काही तज्ज्ञांनी मात्र चीनच्या या हालचालींवर संशय व्यक्त केला आहे. त्यांना असे वाटत आहे, की चीन अशा प्रकल्पांच्या माध्यमातून पाकिस्तान सरकारवरील आपले नियंत्रण आधिक मजबूत करेल. यामध्ये तथ्यही आहे. कारण, चीनचा आजवरचा इतिहास पाहिला तर तो विश्वासघाताचाच आहे. देशांना विश्वासात घेऊन त्यांची फसवणूक करण्याचे काम चीन सतत करत आला आहे.

Advertisement

आताही चीन पुढील चार वर्षात आपले 50 लाख कामगार पाकिस्तान मध्ये पाठवणार आहे. यामध्ये फक्त वैद्यकिय क्षेत्रातीलच लोक असतील याची काहीच खात्री नाही. चीन त्यांच्या वेशात आपल्या गुप्तचर यंत्रणेतील लोक, तसेच सैन्यातीलही काही जणांना येथे पाठवू शकतो, याचीही शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

कारण, चीनने आधीच सीपीइसी प्रकल्पासाठी पाकिस्तानमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पाकिस्तानला कर्ज सुद्धा दिले आहे. त्यामुळे चीनचा बराच पैसा येथे अडकला आहे. त्यातच आता या प्रकल्पाचे काम सुद्धा होत नसल्याने चीनचे टेन्शन वाढले आहे. पाकिस्तानला मात्र या प्रकल्पाची तितकी काळजी वाटत नसल्याचे दिसत आहे. असे असले तरी चीनच्या या कारवायांचा खरा उद्देश पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही, असेच दिसत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply