Take a fresh look at your lifestyle.

देशात पावसाचा मुक्काम कायम; 5 दिवसात अनेक राज्यात होणार मुसळधार पाऊस; पहा, नेमके काय म्हटलेय हवामान विभागाने

नवी दिल्ली : राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे. राज्याप्रमाणेच देशातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात देशात अनेक राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. पुढील चार दिवसात राजस्थान आणि गुजरात राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर 25 सप्टेंबरपर्यंत उत्तराखंड राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये 24 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Advertisement

स्कायमेट वेदर संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, पूर्व राजस्थान, मराठवाडा, तेलंगाणा, कोकण, गोवा येथे अनेक ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार पाऊस होईल. तसेच सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमधील काही जिल्हे, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू काश्मीर, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. मध्य प्रदेश राज्यातील 13 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

हवामान विभागानुसार, मध्य प्रदेश राज्यात एकाच वेळी तीन हवामान यंत्रणा तयार झाल्याने मान्सून सक्रीय आहे. यामुळे गुजरात, राजस्थान राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. तर दुसरीकडे बंगालच्या खाडीत 25 सप्टेंबर रोजी पुन्हा एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सप्टेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस सुरुच राहिल.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply