Take a fresh look at your lifestyle.

साईसंस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक, पाहा नेमकं कशामुळे ही कारवाई झाली..?

अहमदनगर : शिर्डीतील साईसंस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांविरुदध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीय. जिल्हा न्यायाधीश तथा साईसंस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या मंदिर भेटीचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

याबाबत साईबाबा मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागाचे प्रमुख विनोद कोते, कर्मचारी चेतक सावळे, सचिन गव्हाणे, सोसायटी कर्मचारी अजित जगताप व राहुल फुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

नेमकं काय घडलं..?
साई संस्थानचा कारभार पाहणाऱ्या तदर्थ समितीचे अध्यक्ष मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि सदस्य, सहायक धर्मादाय आयुक्तांनी ३१ जुलै २०२१ रोजी मंदिर परिसराला भेट दिली होती. बैठक संपल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील उपाय योजनांची पाहणी केली. मात्र, नंतर त्यांच्या या पाहणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले.

Advertisement

कोरोनाच्या नियमांचा भंग करून या पदाधिकाऱ्यांनी मंदिराला भेट देत दर्शन घेतल्याचे सांगत हे व्हिडिओ सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले. तशा बातम्याही सोशल मीडियातून प्रसारित झाल्या.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणात चौकशीचा आदेश देण्यात आला. मात्र, बराच काळ चालढकल सुरू होती. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याबाबत न्यायालयात पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सहा जण दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या पाहणीचे संस्थानच्या ताब्यातील फुटेज बाहेर खासगी व्यक्तींना पाठवून त्यासोबत चुकीचा आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अखेर ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

सोन्याला घरघर..! वर्षभरात तब्बल इतक्या रुपयांनी कोसळले भाव; आजही दर कपात कायम
झी एंटरटेनमेंट-सोनी पिक्चर्सचे एकत्रीकरण, भागधारकांवर काय परिणाम होणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply