Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तान आणखी संकटात..! चिनी कंपन्यांना द्यावे लागणार कोट्यावधी रुपये; ‘तो’ निष्काळजीपणा चांगलाच नडला

नवी दिल्ली : चीनच्या महत्वाकांक्षी सीपीइसी प्रोजेक्टसाठी चीनने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. पाकिस्तानला अब्जावधींचे कर्ज दिले आहे. असे असतानाही पाकिस्तानने मात्र हलगर्जीपणा केल्याने चीन संतापला आहे. मागील तीन महिन्यात या प्रकल्पाचे काहीच कामकाज झाले नसल्याने चीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे चीनने पाकिस्तानवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला इच्छा नसतानाही पैसे खर्च करावे लागणार आहे. या प्रकल्पात चिनी कंपन्यांना नुकसान भरपाई म्हणून तब्बल 1.4 अब्ज डॉलर्स भरपाई देण्याचा प्रयत्न पाकिस्तान करणार आहे. पाकिस्तान आधीच कंगाल आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशा परिस्थितीत हा अब्जावधींचा खर्च करणे पाकिस्तानला भाग पडणार आहे.

Advertisement

या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या वीज उत्पादकांचे जवळपास 230 अब्ज डॉलर्स देणे आहे. याबाबत आता चीनमधील गुंतवणूकदार सरकारकडे तक्रारी करत आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने डॉन वेबसाइटला सांगितले. या महिन्यात किंवा पुढील महिन्यात काही पैसे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चिनी कंपन्या कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे. या व्यवहारात आता पाकिस्तानला सुद्धा नुकसान सहन करावे लागत आहे.

Advertisement

प्रकल्पाचे काम अपेक्षित गतीने होत नाही. यामध्ये वारंवार अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढत चालला आहे. काही प्रांतातील नागरिक या प्रकल्पास विरोध करत आहेत. आतंकवादी हमल्यांच्या घटनाही घडल्या आहेत. या सगळ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. चीनने मात्र अब्जावधी रुपये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प पूर्ण होणे सुद्धा गरजेचेच आहे.

Advertisement

मात्र, पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता यामध्ये कितपत यश मिळेल हे आाताच सांगता येणे कठीण आहे. चिनी कंपन्या प्रकल्पाच्या कामकाजावर कमालीच्या नाराज आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने सीपीएसी (चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर) प्रकल्पाचे वाटोळे केले अशा तक्रारी चिनी राजदूतांनी केल्या आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply