Take a fresh look at your lifestyle.

आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, सनरायजर्स हैदराबाद संघाचा हा दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित, 6 जण विलगीकरणात..

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2021) स्थगित करावी लागली होती. त्यानंतर 19 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा युएईमध्ये आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली. आतापर्यंत तीन सामने झालेले असतानाच, पुन्हा एकदा आयपीएलवर मोठे संकट कोसळले आहे..

Advertisement

कोरोना महामारीने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये शिरकाव केला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा फास्ट बाॅलर टी. नटराजन याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, हैदराबाद संघाचा आजच (ता. 22) दिल्ली कॅपिटल्स संघासोबत सामना होणार असतानाच ही बातमी समोर आलीय. टी. नटराजन कोरोनाबाधित आढळून आल्याचे समजताच, सुरक्षेचा उपाय म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या हैदराबाद संघातील सहा सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान, टी. नटराजन कोरोनाबाधित आढळून आला असला, तरी त्याचा आजच्या सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही. निर्धारित वेळेनुसार, हा सामना सुरु होणार असल्याचे आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली.

Advertisement

नटराजनच्या संपर्कात?
१) विजय शंकर – (ऑलराऊंडर खेळाडू), २) विजय कुमार – (टीम मॅनेजर), ३) श्याम सुंदर जे. – (फिजीओथेरपिस्ट), ४) अंजना वन्नन – (डॉक्टर), ५) तुषार खेडकर – (लॉजिस्टीक मॅनेजर), ६) पेरियसामी गणेशन – (नेट बॉलर).

Advertisement

नटराजनचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने तात्काळ सर्व संघातील सदस्यांच्या RTPCR टेस्ट करण्यात आल्या. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आजचा दिल्लीविरुद्धचा सामना नियोजित वेळेत खेळवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply