Take a fresh look at your lifestyle.

केंद्र सरकार ‘त्या’ कुटुंबांना देणार 50 हजार रुपये मदत; पहा, सरकारने नेमके काय म्हटलेय

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संकटात लाखो लोकांनी प्राण गमावले. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबास 50 हजार रुपये मदत देण्यात येईल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. केंद्र सरकारने असे धोरण घेतल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ही रक्कम देण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या प्रकरणी न्यायालयाने सरकारला याआधी अनेक वेळा विचारले होते. त्यानंतर सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

Advertisement

देशात कोरोना या घातक आजाराने कोट्यावधी लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची कुटुंबे संकटात सापडली. अनेक अडचणी त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या. कोरोनाचे संकट अभूतपूर्व होते. त्यामुळे या आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार ते पाच लाख रुपये मदत सरकारने द्यावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, इतकी मदत देता येणार नसल्याचे सरकारने न्यायालयात सांगितले. न्यायालयाने सुद्धा सरकारचा युक्तिवाद मान्य केला. मात्र, मृतांच्या कुटुंबियांना सन्मानजनक मदत मिळायला हवी, यासाठी मार्ग काढण्याच्या सूचना न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या. त्यानंतर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये मदत देणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.

Advertisement

नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणी मृत्यूमुखी पडल्यास त्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून साधारण 4 लाख रुपये मदत देण्यात येते. मात्र, कोरोनाचे संकट वेगळे आहे, असे केंद्र सरकारने शपथपत्रात म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने सरकारचा दावा मान्य केला. तसेच मृतांच्या कुटुंबियांना किती मदत द्यावी, ते सरकारने ठरवावे, असे न्यायालयाने म्हटले होते.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply