Take a fresh look at your lifestyle.

आता इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगचे टेन्शन विसरा; ‘ही’ कंपनी सुरू करणार इतके चार्जिंग स्टेशन

नवी दिल्ली : देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. या दरवाढीमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. त्यामुळेच तर देशात इलेक्ट्रीक वाहनांना अच्छे दिन आले आहेत. इलेक्ट्रीक वाहनांना मागणी वाढत आहे. मात्र, वाहनांच्या चार्जिंगबाबत काही अडचणी आहेत, त्याचा फटका या वाहन उद्योगास बसत आहे. ही अडचण लक्षात आल्याने सरकारने त्यानुसार नियोजनास सुरुवात केली आहे. तसेच काही खासगी कंपन्याही या क्षेत्रात दाखल झाल्या आहेत.

Advertisement

इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इलेक्ट्रीक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणारी कंपनी ‘इव्हीआरइ’ ने स्मार्ट पार्किंग सोल्युशन्स ब्रँड पार्क प्लस या कंपनी बरोबर करार केला आहे. ही कंपनी पुढील दोन वर्षात देशभरात 10 हजार चार्जिंग स्टेशन सुरू करणार आहे.

Advertisement

कंपनी इलेक्ट्रीक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती, बांधकाम, स्थापना, ऑपरेशन आणि देखभाल करेल. तर पार्क प्लस कंपनी रिटेल व्यवस्था आणि व्यवस्थापन करेल, असे EVRE कंपनीने निवेदनात म्हटले आहे. या कामी केंद्र सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. देशभरात चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी सरकारने एक योजना सुरू केली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणा दरम्यान चार्जिंग स्टेशनची संपूर्ण माहिती देण्यात येते. तसेच नवीन तंत्रज्ञान काय आहे हे सुद्धा शिकवण्यात येते. नीती आयोगाने याबाबत काही नियम तयार केले आहेत.

Advertisement

या प्रशिक्षणात सौर ऊर्जेवर चालणारे चार्जिंग स्टेशन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, व्यवसाय, सौर पीव्ही चार्जिंग कनेक्टीव्हिटी लोड, वीज दर यांबाबत माहिती देण्यात येते. या चार्जिंग स्टेशनच्या व्यवसायाबाबत सुद्धा आवश्यक माहिती देण्यात येते. अनेक कंपन्या इव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी फ्रँचायजी देतील. या कंपन्यांकडून फ्रँचायजी घेऊन तुम्हाला सुद्धा चार्जिंग स्टेशन सुरू करता येईल.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply