Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘त्या’ निर्णयामुळे गुंतवणूकदार बनले मालामाल; पहा, किती कोटींचा मिळालाय फायदा

मुंबई : झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया या दोन कंपन्या एकत्र येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. या निर्णयानंतर शेअर बाजाराचा ट्रेंडच बदलला आहे. झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. या कंपनीच्या शेअर्समध्ये 23 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ नोंदवण्यात आली. गुंतवणूकदारांनाही एकाच झटक्यात कोट्यावधींचा फायदा झाला आहे. गुंतवणूकदारांना थोडा थोडका नाही तर तब्बल 5 हजार 700 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

या वृत्तानंतर झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. या वाढीमुळे गुंतवणूकदारांना 5782.31 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. मंगळवारी बीएसई इंडेक्सवर कंपनीचा शेअर 255.65 रुपयांवर बंद झाला होता. या दरावर कंपनीचे मार्केट कॅप 24,555.58 कोटी रुपये होते. त्यानंतर बुधवारी मात्र वेगवान घडामोडी घडल्या. झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाची घोषणा करण्यात आली. यानंतर झी एंटरटेनमेंटचे मार्केट कॅप 5782.31 कोटी रुपयांनी वाढून 30,337.89 कोटी रुपयांवर पोहोचले.

Advertisement

या निर्णयानुसार, टिव्ही व्यवसाय, डिजिटल मालमत्ता, उत्पादन संचालन आणि दोन्ही कंपन्यांचे कार्यक्रम लायब्ररी देखील एकत्र केले जाणार आहे. ZEEL च्या बोर्ड मेंबरने या एकत्रीकरणास मंजुरी दिली आहे. दोन्ही नेटवर्क आल्यानंतरही पुनीत गोयंका एमडी-सीईओ असणार आहेत. दोन्ही कंपन्यांनी नॉन बाइंडिंग टर्मशीटवर सही केली आहे. सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट आता 157.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सद्यस्थितीत झी एंटरटेनमेंटची भागीदारी 61.25 टक्के आहे. आता मात्र भागीदारी बदलणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर सोनी एंटरटेनमेंटचा हिस्सा जास्त राहणार आहे. सोनी एंटरटेनमेंट 52.93 टक्के तर झी एंटरटेनमेंट 47.07 टक्के असे भागीदारीचे स्वरुप राहिल.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply