Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला घरघर..! वर्षभरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी कोसळले भाव; आजही दर कपात कायम

मुंबई : सोन्याच्या दरात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात आज वाढ नोंदवण्यात आली. मागील वर्षात याचवेळी सोन्याचे दर 56 हजारापर्यंत पोहोचले होते. आता मात्र यामध्ये 10 हजार रुपये कमी झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने 46 हजार 633 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करत आहे.

Advertisement

गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. राजधानी नवी दिल्लीत 22 कॅरेटसाठी 45 हजार 650 रुपये तर 24 कॅरेटसाठी 49 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम असे दर आहेत. मुंबईमध्ये 22 कॅरेटसाठी 45 हजार 330 रुपये तर 24 कॅरेटसाठी 46 हजार 330 रुपये असे दर आहेत. मंगळवारच्या तुलनेत आज चांदीचे दर 200 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे चांदी सध्या 59 हजार 800 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. असे असले तरी चांदीच्या सप्टेंबरच्या वायदे दरात मात्र थोडी वाढ झाली आहे. चांदीच्या सप्टेंबरच्या वायदे दरात 0.71 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचे 60 हजार 870 रुपये प्रति किलो असे आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

दरम्यान, आता सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे सोन्यास मागणी वाढण्याची शक्यता आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात मागणीत वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असे घडले तर सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply