Take a fresh look at your lifestyle.

पॅनकार्ड, पासपोर्टसाठी अर्ज करायचाय..? मग, रेशन दुकान आहे ना; पहा, रेशन दुकानांबाबत सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय

मुंबई : देशातील रेशन दुकानांबाबत केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होणार आहे. आता तुम्हाला पॅनकार्ड, पासपोर्टसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी रेशन दुकानात गेले तरी काम होणार आहे. इतकेच नाही तर विज बिल, पाणी आणि अन्य देयकांचाही भरणा रेशन दुकानांतून करता येईल. देशातील रेशन दुकानांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड बरोबर करार केला आहे.

Advertisement

या अंतर्गत पॅन किंवा पासपोर्टसाठी अर्ज करणे तसेच इलेक्ट्रिसिटी बिल, पाणी बिल आणि अन्य प्रकारची देयके भरणा करणे अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. या टप्प्यात रेशन दुकाने सीएससी सेवा केंद्रे म्हणून विकसित केली जातील. अशा सीएससी केंद्रांना त्यांच्या सोयीनुसार निवड करण्यास सांगण्यात येणार आहे. या सुविधा रेशन दुकानात मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होईल तसेच या दुकानांचे उत्पन्न सुद्धा वाढेल, असे ग्राहक मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

या व्यतिरिक्त नागरिकांना दिलेल्या रेशन कार्डमध्ये काही बदल करायचे असतील. जसे की, नवीन कार्डसाठी अर्ज करणे, सध्याचे रेशनकार्ड अपडेट करणे, रेशनकार्ड आधारशी लिंक करणे, उपलब्धता आणि सद्यस्थिती तपासणे आणि तक्रार करणे यांसारख्या सुविधा संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीएससीद्वारे नोंदणी अतिरिक्त पर्याय म्हणून प्रदान केली जाऊ शकते.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply