Take a fresh look at your lifestyle.

राज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट

पुणे : राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. आजही पावसाने अनेक जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. राज्यासह देशभरात पावसासाठी सध्या अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे. हवामान विभागाने आता पुढील 48 तासांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार, राज्यातील फक्त 8 जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या सुद्धा पावसाचा अंदाज आहे.

Advertisement

भारतीय हवामान विभागाने आज कोल्हापूर, सांगली, नगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार आहे. त्यानुसार आज राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे, नगर शहरात आज दुपारी जोरदार पाऊस पडला. दुपारच्या वेळेस हवामानात बदल होऊन अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

Advertisement

हवामान विभागाने उद्याही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उद्या जळगाव, सोलापूर, नगर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे सात जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असे विभागाने म्हटले आहे.

Advertisement

‘आयएमडी’ ने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारी परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. पण येत्या काळात बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती मंदावणार आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply