Take a fresh look at your lifestyle.

आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, चांदीची चमक मात्र वाढली; जाणून घ्या, आजचे नवीन भाव

मुंबई : आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. कमजोर जागतिक संकेतांमुळे असे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याच्या दरात 0.16 टक्के घसरण झाल्याचे दिसून आले. तर याच वेळी चांदीचे दर मात्र काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. आज सोन्याच्या दर कमी झाल्याने सोने सध्या 46 हजार 205 प्रति दहा ग्रॅम पर्यंत आले आहे. दुसरीकडे चांदी 0.1 टक्क्यांच्या वाढीसह 59 हजार 615 रुपये प्रति किलो आहे.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, देशातील सर्व शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव वेगवेगळा आहे. 21 सप्टेंबर रोजी देशाची राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,570 रुपये आहे. तर मुंबईत 46,120 रुपये, चेन्नईमध्ये 47,550 आणि कोलकातामध्ये 48,240 रुपये आहे. तसेच 22 कॅरेटसाठी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45,440 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये 43,590 रुपये, मुंबईत 45,120 रुपये आणि कोलकातामध्ये 45,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर सर्वोच्च 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. त्याआधारे आता सोने त्यातुलनेत 10 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

Advertisement

दरम्यान, देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply