Take a fresh look at your lifestyle.

सणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत झालाय ‘तो’ महत्त्वाचा निर्णय..!

नवी दिल्ली : कोरोना संकटातून हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येतेय. त्यामुळे अनेक जण घराचे स्वप्न पाहू लागले आहेत. मात्र, त्यात सर्वात मोठी अडचण येते, ती पैशांची..! अशा वेळी मदतीला धावतात बॅंका.. होमलोनच्या मदतीने घराचे स्वप्न साकार करणे सोपे झाले आहे. त्यातही सध्या व्याजदर मोठ्या प्रमाणात घटले आहेत. त्याचा लाभ नवीन कर्जदारांना घेता येणार आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राचाही फायदा होणार आहे.

Advertisement

सध्या सणासूदीचे दिवस असल्याने, विविध मुहूर्तावर अनेक जण खरेदीला पसंती देतात. ही संधी साधून बॅंकांनीही कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. त्यात आघाडीवर आहे, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, अर्थात एचडीएफसी (HDFC)..

Advertisement

देशातील या दिग्गज गृहकर्ज पुरवठादार बॅंकेने सणांच्या पार्श्वभूमीवर गृहकर्जाच्या व्याजदरांत मोठ्या कपातीची घोषणा केलीय. या बॅंकेकडून ग्राहकांना कमीत कमी 6.70 टक्के वार्षिक दराने गृहकर्ज मिळणार आहे. हे व्याजदर 20 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले असून, त्याचा लाभ 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत, म्हणजेच दिवाळीच्या आधीच्या आठवड्यापर्यंत मिळणार आहे.

Advertisement

एचडीएफसी (HDFC)ची ही स्पेशल लोन ऑफर ग्राहकाच्या क्रेडिट स्कोअरशी जोडलेली असेल. शिवाय या ऑफरमध्ये HDFC ने एम्प्लॉयमेंट कॅटेगरीच्या आधारे व्याजदरांत फरक ठेवलेला नाही. थोडक्यात, पगारदार असो वा व्यावसायिक/उद्योजक.. ज्याचा क्रेडिट स्कोअर चांगला, त्याला विशेष ऑफर अंतर्गत या सवलतीच्या व्याजदराचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

गेल्या काही वर्षांत घरांच्या किमतीत फारसा फरक झालेला नाही. कमी-अधिक प्रमाणात घरांच्या किमती सारख्याच असताना, नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झालीय. गृहकर्जाचे व्याजदर विक्रमी पातळीवर खाली आल्याने प्रधानमंत्री आवास योजनेशी संबंधित सबसिडी आणि अन्य कर लाभ मिळण्यामुळे घरांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे एचडीएफसी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका रेणू सूद-कार्नाड यांनी सांगितले.

Advertisement

‘एचडीएफसी’प्रमाणेच कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), पंजाब नॅशनल बँक (PNB), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ इंडिया (BoB) यांनीही गृहकर्जांच्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले व्याजदर कमी करण्याची घोषणा केली होती. ते नवीन दर 15 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले. स्टेट बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. कर्जाचे व्याजदरही कमी झाल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जासह अनेक प्रकारच्या कर्जांचा मासिक हप्ता (EMI) कमी होणार आहे.

Advertisement

भाजपला पुन्हा बसणार मोठा झटका; तृणमूलच्या त्या मंत्र्याने केलाय खळबळजनक दावा; फोडाफोडीचे राजकारण जोरात
राज्यपालांनी विरोधी पक्षाचा सूर आळवणे संसदीय लोकशाहीस मारक..

Advertisement
Advertisement

Leave a Reply