Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या आजचा बाजारभाव..

नवी दिल्ली : सोन्याची खरेदी करणारा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतातील विविध शहरात सोन्याचे दर वेगवेगळे असतात. कारण एक्साइज ड्युटी, राज्यांतील कर आणि घडणावळीसाठी लागलेले शुल्क, या मुळे सोन्याचे दर वेगवेगळे असतात.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज (सोमवारी) कमकुवत जागतिक संकेतांमुळे सोने-चांदीचे भाव घसरले. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती मजबूत झाल्याने अमेरिकन डॉलर मजबूत झाला. त्यामुळे सुरक्षित आश्रयस्थानाची मागणी कमी झाली. या आठवड्याच्या शेवटी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदार सावध आहेत. स्पॉट सोने 0.1% घसरून 1,752.66 डॉलर प्रति औंस झाले आहे.

Advertisement

अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने या महिन्यात एमसीएक्सवर (MCX) सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. ऑक्टोबर वायदा सोने 0.13 टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर डिसेंबर वायदा चांदीच्या किमती 1 टक्क्यानं घसरल्या. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचे भाव 0.16 टक्क्यांनी घसरले होते, तर चांदीचे भाव 1.76 टक्क्यांनी कमी झाले होते.

Advertisement

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याची किंमत 58 रुपयांनी (0.13 टक्के) घसरून 45,928 रुपये प्रति तोळा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने 0.1 टक्क्यांनी घसरून 1752.66 डॉलर प्रति औंस झाले होते.

Advertisement

एमसीएक्सवर डिसेंबर वायदा चांदी 565 रुपयांनी (1 टक्का) घसरून 59,427 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून 22.33 डॉलर प्रति औंस झाली.

Advertisement

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी  यची असेल तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकताच, शिवाय त्याच्याशी संबंधित तक्रारही करू शकता.

Advertisement

या अॅपमध्ये मालाचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळला तर ग्राहक त्याबद्दल त्वरित तक्रार करू शकतो. या अॅपद्वारे (गोल्ड) ग्राहकाला तक्रार नोंदवण्याची माहितीही लगेच मिळेल.

Advertisement

श्रीमंताच्या गाड्यात ८ एअरबॅग्ज, मग सामान्यांच्या गाड्यांमध्ये दोनच का..? नितीन गडकरी यांचा सवाल..
या व्यवसायासाठी टाटा-बिर्ला-अंबानींमध्ये लागलीय स्पर्धा, ग्राहकांचा होणार फायदाच फायदा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply