Take a fresh look at your lifestyle.

गुणतालिकेत चेन्नईची बाजी…पोहचली त्या क्रमांकावर…वाचा कोणता संघ कितव्या स्थानी…

काल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला धुळ चारत 20 धावांनी विजय साजरा केला.

दुबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबलेल्या आयपीएलची पुन्हा जोमात सुरूवात झाली आहे. भारतीय संघाच्या इंग्लड दौऱ्यानंतर आता संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयपीएलचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळत आहे. मात्र काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज च्या सामन्यात चेन्नईने गुणतालिकेत उलथापालथ घडवली.

Advertisement

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा थांबलेला प्रवास दुबईत पुन्हा जोरदार पध्दतीने सुरू झाला. तर काल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला धुळ चारत 20 धावांनी विजय साजरा केला. त्यामुळे तिसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नईने गुणतालिकेत दिल्लीला धोपीपछाड देत अव्वल स्थान गाठले. काल झालेल्या सामन्यासह चेन्नईच्या संघाच्या 8 लढती झाल्या आहेत. त्यापैकी चेन्नईने 6 लढतींमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाचे 12 गुण झालेले आहेत. मात्र दिल्ली संघ 12 गुणांसह अव्वल स्थानावर होता. मात्र चेन्नईने रणरेटच्या जीवावर दिल्लीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. तर गेल्या वर्षी युएईत पानिपत झालेल्या चेन्नईच्या संघाने मुंबई इंडियन्सला धुळ चारल्याने चेन्नईचे चाहते आनंदात आहेत.

Advertisement

points table ipl 2021 – Google Search

Advertisement

सध्या गुणतालिकेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई पहिल्या, दिल्ली दुसऱ्या तर विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे. तर पराभवानंतरही मुंबई इंडियन्स संघ चौथ्याच स्थानावर आहे. मात्र मुंबई इंडियन्सचा रनरेट कमी झाल्याने बाद फेरीच्या प्रवेशावेळी त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

काल ऋतुराज गायकवाडने साकारलेली 88 धावांची खेळी आणि ड्वेन ब्राव्होने 8 चेंडूत तीन षटकारांसह काढलेल्या 23 धावा आणि तीन विकेटचा चेन्नईच्या विजयात मोठा वाटा आहे.

Advertisement

IPL 2021 : तर सप्टेंबरमध्ये आयपीएल झाल्यास ‘हे’ खेळाडू खेळू शकणार नाहीत..!

Advertisement

सोशल मीडियातून नितीन गडकरींची भरगच्च कमाई, दर महिन्याला किती कमावतात पाहा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply