Take a fresh look at your lifestyle.

अंगातील भुत उतरवण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने महिलेसोबत केले असे काही…वाचा नेमकं प्रकरण…

विज्ञानाने प्रगती केली असली तरी अशिक्षित लोकांसोबतच सुशिक्षित लोकांवरही अंधश्रध्देचा मोठा पगडा आहे. विज्ञानाने अनेक शोध लावले असतानाही येणाऱ्या अडचणींच्या मागे भुत किंवा पिशाच्च बाधा असू शकते असा काहीसा समज लोकांमध्ये आहे.

मुंबई : विज्ञानाने प्रगती केली असली तरी अजूनही लोकांचा भुत पिशाच्चावर मोठा विश्वास आहे. त्यामुळे भुत उतरवण्याच्या नावाखाली अनेक भोंदू बाबांचं फावतं. एखादी महिला आजारी असेल तर तिला भुताची बाधा झाली आहे, असे सांगत अंधश्रध्दा पसरवली जाते. तर भुत उतरण्याच्या नावाखाली भोंदू बाबांकडून महिलांचं, मुलांचं मोठ्या प्रमाणावर शोषण केले जाते. त्यामुळे या सगळ्याविरोधात अंधश्रध्दा निर्मुलन समीती धडपडताना दिसते. मात्र असाच एक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

विज्ञानाने प्रगती केली असली तरी अशिक्षित लोकांसोबतच सुशिक्षित लोकांवरही अंधश्रध्देचा मोठा पगडा आहे. विज्ञानाने अनेक शोध लावले असतानाही येणाऱ्या अडचणींच्या मागे भुत किंवा पिशाच्च बाधा असू शकते असा काहीसा समज लोकांमध्ये आहे. त्यामुळे या भुत पिशाच्चापासून मुक्ती देण्याच्या नावाखाली दुकान मांडलेल्या भोंदू बाबांचं चांगलंच फावतं. तर भोंदू बाबांकडून भुत उतरवण्याच्या नावाखाली किळसवाणे कृत्य केले जाते. असाच एक प्रकार मुंबईतील नालासोपारा भागात घडला आहे.

Advertisement

नालासोपाराच्या पश्चिमेकडील निळे मोरे गावाजवळील आदिवासी पाड्यात एका भोंदू बाबाने महिलेच्या अंगातील भुत काढण्याच्या नावाखाली अमानुष मारहाण केली आहे. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या भोंदू बाबाच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात श्री भैरवनाथ मंदिर आहे. तर या मंदिराचा बाबा पुजारी हेमराज आपली भोंदूगिरी चालवत आहे.

Advertisement

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या घटनेमध्ये भोंदू बाबा महिलेच्या अंगावर पाणी टाकून तिच्या कपाळावर इबिद लावत आहे. तर महिलेच्या अंगातील भुत पळवण्यासाठी बाबा हे अमानुष कृत्य करत असल्याचे समजत आहे. तसेच या महिलेला तिच्या पतीनेच भुत काढण्यासाठी आणले असल्याचे समोर आले आहे. तर हा बाबा गेल्या 10 ते 12 वर्षापासून हे काम करत असल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे अशा भोंदू बाबांचे दुकान बंद करण्यासाठी समाजात जागृती होणं गरजेचं असल्याचे अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply