Take a fresh look at your lifestyle.

सावधान…! बियरमुळे तुमच्या त्या अवयवांवर होतो गंभीर परीणाम…वाचा…

बियर हे लोकप्रिय पेय मानले जाते. त्यामुळे थकवा घालवण्यासाठी लोकांकडून थंड बियरचा आनंद घेतला जातो. तर बियर ही शरीरासाठी चांगली असल्याचे कारण देतांना म्हटले जाते की, बियरमध्ये केवळ 5-12 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते. मात्र बियर हे मादक पेय आहे.

मुंबई : सध्या अनेक पार्टीमध्ये तरूण बियर हे पेय पितात. तर बियर तरूणांसह श्रीमंत लोकांमध्ये लोकप्रिय प्रकार आहे. ताण कमी करण्यासाठी सध्या बियरचं मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते.  त्यामुळे थकलेल्या मेंदूला आराम देण्यासाठी आणि तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी बियर या पेयाला प्राधान्य दिले जाते. मात्र बियरच्या सेवनाने शरीरावर गंभीर परीणाम होतात.

Advertisement

बियर हे लोकप्रिय पेय मानले जाते. त्यामुळे थकवा घालवण्यासाठी लोकांकडून थंड बियरचा आनंद घेतला जातो. तर बियर ही शरीरासाठी चांगली असल्याचे कारण देतांना म्हटले जाते की, बियरमध्ये केवळ 5-12 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते. मात्र बियर हे मादक पेय आहे. त्यामुळे अनेक लोक दिवसातून एकदातरी बियरचे सेवन करतात. (DRink Beer Daily or Night) त्यामुळे त्यांचा थकवा निघून जातो, असा दावा केला जातो. मात्र बियरच्या सेवनाने शरीरातील विविध अवयवांवर गंभीर परीणाम होतो.

Advertisement

बियरच्या बाबतीत अनेक संशोधनांतून हे सिध्द झाले आहे की, बियरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असले तरी त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे एक बियरच्या पेगमध्ये 150 कॅलरी असतात. तर शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. तरल बियरमध्ये असलेल्या कॅलरी आपण सेवन करत असलेल्या अन्नापेक्षा वेगळ्या असतात त्यामुळे त्या आपल्या शरीरात साठतात. म्हणून बियर पिणाऱ्याच्या शरीराची चरबी वाढायला लागते. तर ही चरबी कमी करणे प्रचंड कठीण मानले जाते.

Advertisement

बियरच्या अतिसेवनाने तुमच्या हृदयाच्या स्नायुंना नुकसान पोहचते. तसेच स्ट्रोक, उच्चरक्तदाब, मधुमेह आणि हृदयाचे ठोके वाढण्याचा त्रास होतो. तर पुरूषांसाठी दोन पेय आणि महिलांसाठी एक पेय हे मध्यम मानले जाते. मात्र ही मर्यादा ओलांडल्यास किडनीच्या आजारांना निमंत्रण देणारे ठरते. तर बियरमुळे सतत लघवी करावी लागल्याने किडनीवर अतिरीक्त ताण येतो. त्यामुळे किडनी निकामी होण्याचा किंवा किडनी स्टोनचा धोका वाढतो.

Advertisement

बियरमुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांची मागणी वाढू शकते. त्यामुळे जेव्हा ही मागणी पुर्ण होऊ शकत नाही तेव्हा त्याचे नुकसान शरीरावर होत असते. तर बियरच्या अतिसेवनाने निद्रानाशालाही सामोरे जावे लागू शकते. तसेच व्हिटॅमिनची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे बियरच्या सेवनापासून शक्यतो दुरच राहणे चांगले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply