Take a fresh look at your lifestyle.

फडणवीस यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या ‘त्या’ दाव्यावर दिलेय प्रत्युत्तर, पहा, नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई : राज्यात सध्याच्या महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. आताही भाजप नेते किरिट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या आरोपांमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि मंत्री भाजप नेत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत आहे. मंत्री मुश्रीफ यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले.

Advertisement

तसेच या पत्रकार परिषदेत त्यांनी एक खळबळजनक दावा केला. भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा दावा त्यांनी केला होता. या मुद्द्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, की कुणी दिली ऑफर, आम्ही असे ऑफर घेऊन थोडे फिरत असतो. असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कुणालाही द्यायला, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

याआधी मुश्रीफ यांनी दावा केला होता, की भाजपमध्ये येण्याची मला ऑफर देण्यात आली होती. मी गेलो नाही म्हणून मला टार्गेट केले जात आहे. त्यानंतर फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत असे काही नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply