Take a fresh look at your lifestyle.

टाटांशी पंगा महागात….मेस्रींचा पाय आणखी खोलात…वाचा नेमकं प्रकरण

पालोंजी गृपने युरेका आणि फोर्ब्स कंपनी टाटा समुहाकडून 20 वर्षापुर्वी खरेदी केली होती. तर युरेका आणि फोर्ब्स कंपनीचे 35 देशांमध्ये तब्बल 2 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. मात्र 2021 मध्ये या कंपनीला 78 कोटींचे नुकसान झाले आणि कंपनीचा पाय आणखीच खोलात गेला. 

मुंबई : टाटा कंपनीतील सायरस मेस्री आणि रतन टाटा यांच्यातील वाद देशभर गाजला होता. त्यानंतर टाटा समुहाने सायरस मेस्री यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर सायरस मेस्री न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयानेही मेस्रींच्या विरोधात निकाल दिला. त्यानंतर टाटांशी पंगा घेतलेल्या मेस्रींचा पाय आता खोलात गेला आहे. त्यामुळे मेस्रींवर मोठे संकट आले आहे.

Advertisement

पालोंजी गृपने युरेका आणि फोर्ब्स कंपनी टाटा समुहाकडून 20 वर्षापुर्वी खरेदी केली होती. तर युरेका आणि फोर्ब्स कंपनीचे 35 देशांमध्ये तब्बल 2 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. मात्र 2021 मध्ये या कंपनीला 78 कोटींचे नुकसान झाले आणि कंपनीचा पाय आणखीच खोलात गेला.

Advertisement

शापुर्जी पालोंजी गृपची कंझ्युमर ड्युरेबल फ्लॅगशीप कंपनी युरेका आणि फोर्ब्स सध्या कर्जाच्या गर्तेत बुडाल्याच्या बातम्या येत आहेत. तर युरेका आणि फोर्ब्स ही कंपनी व्हॅक्युम क्लिनर, वॉटर प्युरिफायर यासारखी उत्पादने बनवते. तर आता ही कंपनी विकत घेण्यासाठी प्रायव्हेट इक्विटी गृप एडवेंट इंटरनॅशनल तयार आहे. त्यामुळे युरेका आणि फोर्ब्स कंपनीच्या विक्रीची एंटरप्रायझेस किंमत 4400 कोटी रूपये ठरवण्यात आली आहे.  त्यामुळे या कंपनीची विक्री करून जुन्या असलेल्या एसपी गृपला आपल्यावर असलेले कर्ज कमी करून मुळ व्यावसायावर फोकस करायला मिळणार आहे. तर एसपी गृपचा मुळ व्यावसाय कंस्ट्रक्शन आणि रियल इस्टेटचा आहे. त्यात युरेका कंपनी कर्जात आहे. तर या कंपनीला लिस्टेड पॅरेंट कंपनी फोर्ब्स आणि कंपनीपासून वेगळे केले जाणार आहे. 

Advertisement

या व्यवहारानंतर एनसीएलटीची परवानगी मिळाल्यानंतर ही कंपनी बाँबे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट केली जाणार आहे. त्यामुळे लिस्टींग होताच एडवेंट कंपनी 72.56 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. त्यानंतर एडवेंट कंपनी एक ऑफर आणेल. त्यामुळे टाटा सन्समध्ये शापुर्जी पालोंज कंपनीची 18 टक्के हिस्सेदारी आहे. मात्र त्या कंपनीवर 20 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे टाटांशी पंगा घेतलेल्या सायरस मेस्रींचा पाय आता आणखी खोलात जात आहे. कारण सायरस मेस्रींची कंपनी कर्जात बुडाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या हातून कंपनी जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply