Take a fresh look at your lifestyle.

भाजपला पुन्हा बसणार मोठा झटका; तृणमूलच्या ‘त्या’ मंत्र्याने केलाय खळबळजनक दावा; फोडाफोडीचे राजकारण जोरात

कोलकाता : केंद्रातील सत्ताधारी भाजपसाठी पश्चिम बंगाल राज्य डोकेदुखीचे ठरत आहे. निवडणुकीत दणदणीत पराभव पत्करावा लागल्यानंतर या राज्यात पक्षाला अनेक झटके बसले आहे. अजूनही जोरदार धक्के बसणार आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, भारतीय जनता पक्षाचे तब्बल दहा आमदार लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत, असा दावा तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चटर्जी यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर मुकुल रॉयसह 5 नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभेत आता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या 75 वरुन 71 वर आली आहे.

Advertisement

विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलच्या अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सुवेंदू अधिकारी, मुकुल रॉय, राजीव बॅनर्जी यांसारख्या नेत्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता येथे काही खरे नाही, असे लक्षात आल्यानंतर तृणमूलमधील नेते पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत.

Advertisement

मुकुल रॉय यांच्यासह 5 जणांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुप्रियो यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केला. भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. त्यानंतर आणखी दहा आमदार भाजप सोडणार असल्याचा दावा पार्थ चटर्जी यांनी केल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Advertisement

निवडणुकी नंतर भाजपमध्ये जास्त घडामोडी घडत आहेत. एकतर अनेक जण तृणमूलमध्ये गेले आहेत. तर दुसरीकडे अनेकांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. मुकुल रॉय यांनी भाजप सोडल्यानंतर सातत्याने भाजप नेते तृणमूलमध्ये सहभागी होत आहेत. निवडणुकी आधी भाजपमध्ये आलेले संसद सदस्य सुनील मंडल पुन्हा तृणमूलमध्ये परतले आहेत. तसेच आणखीही काही नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. आमदारांनी पक्ष सोडू नये, यासाठी भाजपकडून प्रयत्न होत आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. कारण, सध्या येथे फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू झाले आहे. निवडणुकी आधी जी परिस्थिती तृणमूल काँग्रेसमध्ये होती, त्याचा अनुभव आता भाजप घेत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply