Take a fresh look at your lifestyle.

कंगाल पाकिस्तान..! पैसे मिळवण्यासाठी आता घेतलाय ‘हा’ निर्णय; पहा, आता काय विकणार ?

नवी दिल्ली : भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तान सध्या स्वतःच्याच जाळ्यात पुरता अडकला आहे. दहशतवादास खतपाणी घालून अन्य देशांना त्रास देण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचे मोठेच नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्ज घेऊन अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या प्रयत्नात पाकिस्तान कंगाल झाला आहे. आता तर अशी वेळ येऊन ठेपली आहे, की पाकिस्तानने चक्क आपली लढाऊ विमानेच विक्रीस काढली आहेत. 12 ‘जेएफ-17 ए ब्लॉक-3’ फायटर विमान अर्जेंटीना या देशास विकणार आहे, अशी माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जेंटीना पाकिस्तानकडून ही विमाने खरेदी करण्याची योजना तयार करत आहे.

Advertisement

जियो टिव्हीच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की अर्जेंटीना 2022 पर्यंत पाकिस्तानकडून फायटर विमाने खरेदी करणार असून यासाठी बजेटमध्ये 66.4 कोटी डॉलर्सची तरतूद या देशाने केली आहे. बजेट देशाच्या संसदेत सादर केले आहे. असे असले तरी अर्जेंटीनाने अद्याप विक्री करारावर सही केलेली नाही. त्यामुळे हा व्यवहार अद्याप अपूर्ण आहे. यामध्ये ऐनवेळी बदल होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

अर्जेंटीनाने याआधी अनेक देशांकडून लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, पैसे आणि ब्रिटीशांच्या आक्षेपामुळे खरेदी करणे प्रत्येक वेळी शक्य झाले नाही.

Advertisement

मागील वर्षात ब्रिटेनने दक्षिण कोरियाई लढाऊ विमानांची अर्जेंटीनास विक्री करण्यास प्रतिबंध टाकले होते. त्यामुळे अर्जेंटीनास विमाने खरेदी करता आली नाहीत. त्यामुळे आता अर्जेंटीना पाकिस्तानकडून जेएफ 17 लढाऊ विमाने खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जेंटीनास विमानांची आवश्यकता आहे. तर पाकिस्तानलाही पैशांची गरज आहे. त्यामुळे हा व्यवहार प्रत्यक्षात येईलही.

Advertisement

मात्र, यामध्ये अडचणीही येण्याची शक्यता आहे. अमेरिका, ब्रिटेन या देशांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ऐनवेळी या देशांचा हस्तक्षेप होणारच नाही, याची खात्री देता येत नाही. असे काही घडले तर कदाचित हा व्यवहार रद्द सुद्धा होऊ शकतो. मात्र, याबाबत आताच काही सांगता येणे कठीण आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply