Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून पाकिस्तानने अमेरिकेला दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; पहा, नेमके काय सुरू आहे राजकारण

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मधील तालिबानी सरकारला अमेरिकेसह अन्य देशांनी अजूनही मान्यता दिलेली नाही. तालिबान सरकारला मान्यता देण्यात उशीर होत आहे, त्याचा त्रास आता पाकिस्तानला होत आहे. त्यामुळे तर पाकिस्तानने अमेरिकेस स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. जर अमेरिकेने तालिबान सरकारला मान्यता दिली नाही तर येथील परिस्थिती अत्यंत खराब होईल, असा इशारा पाकिस्तानने दिला आहे. अमेरिकेने जर तालिबान सरकार बरोबर चर्चा सुरू केली नाही, सकारात्मक धोरण घेतले नाही तर या क्षेत्रातील अडचणी आणखी वाढतील, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. रशियन प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिकेच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

Advertisement

अफगाणिस्तान मध्ये सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्यास पाकिस्तान जबाबदार आहे. तसेच तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. इतकेच नाही तर अमेरिकी सिनेट सदस्यांनी पाकिस्तानवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते आता अमेरिकेवर आरोप करत आहेत. याआधीही इम्रान खान यांनी अमेरिकेवर टीका केली होती. आताही पुन्हा त्यांनी अमेरिकेच्या धोरणांवर टीका केली आहे.

Advertisement

तसेही आता अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात वादच जास्त होत आहेत. यास पाकिस्तानही तितकाच जबाबदार आहे. चीनच्या गटात सहभागी झाल्याने हा वाद आणखीच वाढला आहे. अफगाणिस्तानच्या प्रकरणामुळे या वादात वाढ झाली आहे. कारण, पाकिस्तान आता तालिबानचे उघडपणे समर्थन करत आहे. या कामी त्यास चीनचीही मदत मिळत आहे. तसेच अमेरिका विरोधी धोरणामुळे आता रशियाचेही समर्थन मिळेल, असे पाकिस्तानला वाटत आहे. भविष्यात काय होईल, याचा मात्र आताच अंदाज देता येत नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply