Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसच्या ‘त्या’ मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; पहा, नेमके काय आहे कारण

नवी दिल्ली : देशात अनेक राज्यात नेतृत्वबदलाचे वारे वाहत आहेत. यावेळी काँग्रेसशासित राज्यात नेतृत्वबदल होणार आहे. कारण, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेत राजीनामा दिला. देशाच्या राजकारणातील ही मोठी घटना ठरली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये बऱ्याच दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू होता. या अंतर्गत वादातून अखेर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. या राजकीय घडामोडींचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

सध्या पंजाबमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. कॅप्टन सिंग सध्या पक्षावर नाराज आहेत. तसेच पक्षांतर्गत वादही वाढला आहे. या वादांमुळेच त्यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आपण काँग्रेसमध्येच आहोत. भविष्यात योग्य वेळी निर्णय घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

पंजाब राज्यात पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे आव्हान असणार आहे. कारण, या पक्षाने पंजाबमध्ये विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या व्यतिरिक्त भाजप आणि अन्य राजकीय पक्षही तयारी  करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत वाद सुरू आहेत. निवडणुकीच्या आधीच असा निर्णय घेतल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल, याबाबत काँग्रेसने अद्याप काहीच स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply