Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारने लसीकरणाचे केलेय रेकॉर्ड; म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर केलाय ‘हा’ गंभीर आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल देशाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा जागतिक विक्रम केला. देशात एकाच दिवसात अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले. याबाबतीत भारताने चीनचाही विक्रम मोडल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असताना विरोधी पक्षांनी मात्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मुद्द्यावर केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. तसेच सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.

Advertisement

लसीकरणाच्या या विक्रमाचा सत्ताधारी मंडळींकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यास तीव्र आक्षेप घेतला आहे. मोदींच्या वाढदिवशी पावणे तीन कोटी लसी दिल्याचे सांगण्यात येत आहे. जर काल इतक्या मोठ्या प्रमाणात लस दिल्या तर आज का दिल्या जात नाहीत, उद्या का दिल्या जाऊ शकत नाहीत, आठवडाभर किंवा महिनाभर अशाच प्रकारची विक्रमी मोहिम का राबवली जात नाही, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहेत.

Advertisement

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा विक्रम करण्यासाठी मागील 15 दिवस लसीकरण जाणीवपूर्वक कमी केले गेले. असे करणे आजिबात योग्य नाही. याआधीच जर लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात लस दिली गेली असती तर त्याचा निश्चितच फायदा झाला असता, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, सध्या देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने राज्यांनी लसीकरणावर आधिक भर द्यावा, अशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिल्या आहेत. तसेच पुढील वर्षात ज्या राज्यात निवडणुका आहेत, तेथेही वेगाने लसीकरण करण्यासाठी नियोजन केले जात आहे. देशात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या काळात अनेक सण आणि उत्सव आहेत. त्यामुळे या काळात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या काळात राज्यांनी जास्त सतर्क रहावे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply